Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय नौदलात अग्निपथ योजने अंतर्गत भरती होत आहे. त्यासंदर्भातली माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - अग्निवीरशैक्षणिक पात्रता - गणित, भौतिकशास्त्र यापैकी किमान एका विषयासह बारावी उत्तीर्णएकूण जागा - 2 हजार 800वयोमर्यादा - 23 वर्षांपर्यंतसंपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2022तपशील- indiannavy.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. careers & jobs मध्ये become an agniveer Agniveer SSR, Agniveer MR यात तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
कोल इंडिया लिमिटेडविविध पदांसाठी भरती होत आहे.पोस्ट - व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी हवेत (यात खाणकाम, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, प्रणाली आणि EDP यांचा समावेश होतो)शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech/B.Sc अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये किमान 60% गुणएूकण जागा - 1 हजार 50 (यात खाणकामसाठी 699, सिव्हिलसाठी 160, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचारसाठी 124, प्रणाली आणि EDP साठी 67 जागा आहेत.)वयोमर्यादा - 30 वर्षांपर्यंतअर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जुलै 2022तपशील - https://www.coalindia.in/ (या वेबसाईटवर गेल्यावर career with cil वर क्लिक करा. jobs at coal india यावर क्लिक करा. Recruitment of Management Trainee on the basis of GATE-2022 Score या लिंकवर क्लिक करा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणेएकूण 32 जागांसाठी भरती होत आहे.सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - MTS (मेसेंजर)शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास किंवा समतुल्य, 1 वर्ष कामाचा अनुभवएकूण जागा - 14
पोस्ट - LDCशैक्षणिक पात्रता - बारावी पास, कम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि., हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.एकूण जागा 8
पोस्ट - MTS (सफाईवाला)शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास, 1 वर्षाचा कामाचा अनुभवएकूण जागा - 5
या सोबतच स्टेनो ग्रेड -II, कुक, MTS draftary पदासाठी प्रत्येकी 1 आणि MTS (चौकीदार) पदासाठी २ जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षनोकरीचं ठिकाण - पुणेऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जुलै 2022तपशील - www.hqscrecruitment.com (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement वर क्लिक करा. तुम्हाला थेट जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)