Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय, अर्ज कसा करायचा यासंबंधित सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

स्टेट बँक ऑफ इंडिया 

पोस्ट - सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 1 हजार 422

वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 नोव्हेंबर 2022

तपशील - sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

यात लक्षात घ्या अर्ज कऱण्यासाी मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर होती ती आता 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. एकूण जागा 330 आहेत.

पोस्ट - कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअर पदवी, 9 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 73

पोस्ट - अतिरिक्त कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी, 7 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 154

पोस्ट - उपकार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 103

वयोमर्यादा - 38 ते 40 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑक्टोबर 2022

तपशील - www.mahagenco.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 09/2022 यावर क्लिक करा. तुम्हाला माहिती मिळेल.)