मुंबई : पोलीस भरती असेल किंवा सैन्य दलातील भरती (Indian army) असेल, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तरुणाई मोठ्या जोमाने कामाला लागते. त्यामुळेच, गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीच्या जाहिरातीला उमेदवारांचा उंदड प्रतिसाद मिळत आहे. गावखेड्यातील युवा वर्ग भरतीच्या परीक्षेची तयारी करतानाही दिसून येतो. शारिरीक चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल दोन्हीसाठी जीवाचं रान करुन उमेदवार स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करतात. स्पर्धा परीक्षा व भरतीची तयारी करणाऱ्या या उमेदवारांना सरकारी नोकरीची (Job) नामी संधी आहे. इंडो-तिबेटियन सीमा पोलीस दलांतर्गत 526 जागांवर भरती होत असून अर्ज करण्याची मुदत आता संपत आली आहे. 14 डिसेंबरपर्यंतच उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत एसआय (दूरसंचार), हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), आणि कॉन्स्टेबल (दूरसंचार) या पदांच्या एकूण 526 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. शैक्षणिक अहर्ता पूर्ण केलेल्या उमेदवारांना पदांनुसार अर्ज दाखल करता येईल. विशेष म्हणजे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात झाली असून आता मुदत संपत आली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव - शैक्षणिक पात्रता
एसआय (दूरसंचार) - B.Sc./ B.Tech/ BCA
हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार)- 12th Pass with PCM/ ITI/ Diploma in Engineering
कॉन्स्टेबल (दूरसंचार) - 10th Pass
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यामुळे, उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचल्यास सर्व ते समजू शकेल.
अर्जाचे शुल्क किती?
या भरती प्रक्रियेसाठी जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना रु. 200/- फी आकारण्यात येत आहे
SC/ST/ माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना रु. 100/- फी आकारण्यात येत आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.itbpolice.nic.in/
इंडो-तिबेटीयन पोलीस फोर्स पद वर्गवारी
एसआय (दूरसंचार) - 92 पदे
हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) - 383 पदे
कॉन्स्टेबल (दूरसंचार) - 51 पदे
पदानुसार वेतन श्रेणी
एसआय (दूरसंचार) - Rs. 35,400 – 1,12,400/-
हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) - Rs. 25,500 – 81,100/-
कॉन्स्टेबल (दूरसंचार)- Rs. 21,700 – 69,100/-
हेही वाचा
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त