Madhukar Pichad passed away : ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मधुकर पिचड यांची आज प्रकृती खालावली होती.  ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. 


ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.


मधुकर पिचड यांचा संपूर्ण प्रवास 


मधुकर काशिनाथ पिचड, माजी मंत्री


जन्मतारीख – ०१ जून १९४१


जात – महादेव कोळी


गाव – राजुर, अहिल्यानगर, वडील शिक्षक होते.


शिक्षण – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए एल एल बीचे शिक्षण. तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात


राजकीय प्रवास –


-    अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड


-    १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड


-    १९८० पासून २००९ पर्यन्त सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले


-    १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.


-    राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती


-    मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय.


-    राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले


-    २०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.


-    मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली


-    मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला


-    आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडलीये


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Gurudwara of Nanded : 94 किलो दागिने वितळवून झाले 48 किलो, गुरुद्वारात आलेल्या दानरुपी दागिन्यांमध्ये गैरव्यवहार, न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश