ISRO Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोमध्ये (ISRO) नोकरीची सुवर्णसंधी आहे. इस्रोने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी isro.gov.in. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. शेवटच्या संधीची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करुन या संधीचा फायदा घ्या.


ISRO Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा 


ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 22 जानेवारी 2024


अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024


ISRO Recruitment 2024 :  इस्रोमध्ये नोकरीची संधी


इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) मध्ये विविध स्पेशलायझेशनमध्ये वैज्ञानिक (Scientist), अभियंता (Engineer), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), परिचारिका (Nurse) आणि ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) या सारख्या विविध पदांसाठी भरतीसाठी (ISRO Recruitment 2024) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी 22 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज दाखल करावा. ISRO च्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने (NRSC) जारी केलेल्या जाहिरातीनुसार (क्रमांक NRSC-RMT-1-2024) या भरतीसाठी उमेदवार 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.


ISRO Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या या भरती अंतर्गत विविध विभागातील एकूण 41 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये वैज्ञानिक (Scientist), इंजिनीअर (Engineer), वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), परिचारिका (Nurse) आणि ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) या विविध पदांवर भरती करण्यात येईल.


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Scientist Recruitment 2024) या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाणून ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. भरतीसाठी इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईटला भेट देऊन भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना शुल्कही भरावं लागेल.


ISRO Recruitment 2024 : वयोमर्यादा


या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 28-30-35 अशी विविध पदांसाठी वेगवेगळी आहे. यासाठी उमेदवाराने अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.


ISRO Recruitment 2024 : इस्रो भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय?


उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी पदांसाठी, एमबीबीएस आणि 2 वर्षांचा अनुभव, परिचारिका, 12वी पास आणि नर्सिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा आणि लायब्ररी असिस्टंटसाठी, संबंधित विषयात पीजी पदवी असणे आवश्यक आहे. इस्रो भरती अंतर्गत विविध पदांसाठी पात्रता आणि निकष वेगळे आहेत, यासाठी उमेदवाराने अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.


ISRO Recruitment 2024 : अर्ज शुल्क


या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावं लागेल. 


इस्रो भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


इस्रो भरतीसाठीच्या थेट ऑनलाईन लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसधी! संरक्षण मंत्रालयात भरती, लगेच करा अर्ज