IOCL Job 2024 News: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी  समोर आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (indian oil corporation limited) अनेक शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. त्यामुळं ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे त्यांनी अर्ज करावा. IOCL च्या शिकाऊ पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 2 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे. 


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 400 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे. या 400 पदांमध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या जागा आहेत. यासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतील. हे करण्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (iocl.com.) येथून तुम्ही या भरतीबद्दल तपशीलवार माहिती देखील मिळवू शकता.


कोण करु शकतो अर्ज? 


ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय, त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा नियमित पूर्णवेळ ITI डिप्लोमा असावा. तंत्रज्ञ शिकाऊ पदासाठी उमेदवाराने संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रात 3 वर्षांचा नियमित डिप्लोमा केलेला असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, किमान 50 टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेले उमेदवार पदवीधर शिकाऊ पदासाठी अर्ज करू शकतात. तर 18 ते 24 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल. 


कशी असणार निवड प्रक्रिया? 


परीक्षेचे अनेक टप्पे पार केल्यानंतर IOCL च्या शिकाऊ पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व प्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी फेरीसाठी हजर राहावे लागेल. यानंतर प्री-एंगेजमेंट मेडिकल फिटनेस चाचणी होईल. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल. हे देखील जाणून घ्या की 19 ऑगस्ट रोजी रात्री 11:55 पर्यंत अर्ज करता येतील.


अर्ज करण्सासाठी फी किती? 


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या पदांची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यांच्यासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. पदानुसार पगारही दिला जाईल. याबद्दल माहिती मिळविण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासावी लागेल.


महत्वाच्या बातम्या:


दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! राज्यात होमगार्डसाठी भरती सुरू, प्रतिदिन 670 रुपये भत्ता