नवी दिल्ली : भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स 2025 द्वारे विविध पदांच्या 250 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र, उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पात्र असलेल्या अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवारांनी 29 सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
कोणत्या केडर, ब्रँचमध्ये भरती?
जनरल सर्व्हिस (जीएसएक्स)/ हायड्रो केडर, पायलट, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, एअर ट्राफिक कंट्रोल लॉजिस्टिक्स, नावल अर्मामेंट इन्सपेक्टोरेट, शिक्षण, इंजिनिअरिंग ब्रँच, इलेक्ट्रिकल ब्रँच या केडरासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
किती जागांवर भरती
जनरल सर्व्हिस (जीएसएक्स)/ हायड्रो केडर 56 जागा, पायलट 24 जागा, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर 21 जागा, लॉजिस्टिक्स 20 जागा, एअर ट्राफिक कंट्रोल 20 जागा, नावल अर्मामेंट इन्सपेक्टोरेट 16, शिक्षण 15 जागा, इंजिनिअरिंग ब्रँच 36, इलेक्ट्रिकल ब्रँचच्या 42 जागा भरल्या जाणार आहेत. या केडरसाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
जनरल सर्व्हिस (जीएसएक्स)/ हायड्रो केडर: 60 टक्के गुणासंह बीई/ बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
पायलट, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, एअर ट्राफिक कंट्रोल:60 टक्के गुणासंह बीई/ बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
लॉजिस्टिक्स: 60 टक्के गुणासंह बीई/ बीटेक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.याशिवाय एमएपीए प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण आवश्यक आहे. बीएससी, बीकॉम आणि बीएससी आयटी यामध्ये प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय पीजी डिप्लोमा फायनान्स, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पूर्ण झालेला आवश्यक आहे.
नावल अर्मामेंट इन्सपेक्टोरेट, शिक्षण, इंजिनिअरिंग ब्रँच, इलेक्ट्रिकल ब्रँच यामधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी भारतीय नौदलाच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्या.
शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना भारतीय नौदलात 10 वर्ष नोकरी करता येईल. याशिवाय प्रत्येकी दोन वर्ष अशी दोन वेळा मुदतवाढ दिली जाईल. यासाठी उमेदवाराची सेवा, अनुभव, कामगिरी, वैद्यकीय पात्रता आणि संबंधित उमेदवाराची इच्छा याचा विचार केला जाईल. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पहिली दोन वर्ष प्रोबेशनचा कालावधी पूर्ण करावा लागेल.
लेफ्टनंट पदी निवड होणाऱ्या उमेदवारांना मूळ वेतन 56100 रुपयांपासून पगार मिळेल. याशिवाय इतर भत्ते देखील मिळतील. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर अशी आहे.
इतर बातम्या :