​Indian Coast Guard Recruitment 2023: मनात देशसेवा करण्याची इच्छा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. भारतीय तटरक्षक दलानं (Indian Coast Guard) सहाय्यक कमांडंट (Assistant Commandant) पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू (Start Registration Process) झाल्याची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. आजपासून या भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे. उमेदवार येथे नमूद केलेल्या चरणांद्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 


या भरती मोहिमेद्वारे ICG मध्ये असिस्टंट कमांडंट - जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स (CPL-SSA), टेक्निकल (इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) आणि लॉ 01/2024 बॅचच्या 71 पदं भरली जाणार आहेत. 


​Indian Coast Guard Vaccancy 2023: अर्ज शुल्क किती? 


भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरावं लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर SC/ST उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. उमेदवार नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड वापरून अर्ज फी भरू शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.


​Indian Coast Guard Recruitment 2023: अर्ज कसा करायचा?


स्टेप 1: सर्वात आधी इच्छुक उमेदवारांनी भारतीय तटरक्षक दलाच्या joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत साईटला भेट द्यावी. 
स्टेप 2: यानंतर होम पेजवर उपलब्ध असिस्टंट कमांडंट पदांच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: उमेदवार स्वतःची नोंदणी करुन त्यानंतर आपला अर्ज भरू शकतात.
स्टेप 4: आता उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रं अपलोड करून अर्ज शुल्क भरावं. 
स्टेप 5: त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
स्टेप 6: अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CISF Jobs 2023: CISF मध्ये 450 हून अधिक पदांची भरती; झटपट अर्ज करा