IBPS Recruitment 2023 : तुम्ही बँकेत नोकरीसाठी (Bank Job Vacancy) संधीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेत 8612 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास 1 जूनपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार  ibps.in या मुख्य संकेतस्थळावर अर्ज दाखल करु शकतात. तसेच यासंबंधित सर्व  माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 8612 जागांवर भरती


आयबीपीएस (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भरती संस्था आहे. या IBPS संस्थेद्वारे राष्ट्रीय बँकामधील भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. IBPS भरती अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून आहे. अर्ज तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल, तर शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नका. लगेचच अर्ज दाखल करा. या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवाराने पूर्ण अधिसूचना नीट वाचून घ्यावी. ही अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


IBPS Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा


अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 1 जून, 2023


अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 21 जून, 2023


पूर्व परीक्षेची तारीख : 17 जुलै ते 22 जुलै 2023


IBPS Recruitment 2023 : रिक्त पदांचा तपशील


या भरती अंतर्गत 8612 पदांवरा भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ऑफीस असिस्टंट तसेच I, II आणि III श्रेणीतील विविध पदांवर भरती करण्यात येईल.


IBPS Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता



  • ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल I : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी

  • ऑफिसर स्केल II, जनरल बँकिंग ऑफिसर, ऑफिसर स्केल III : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी

  • ऑफिसर स्केल II स्पेशलिस्ट व्यवस्थापकीय अधिकारी : वेगवेगळ्या स्पेशलायझेशनसाठीची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.


IBPS Recruitment 2023 : अर्जाचे शुल्क


IBPS भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. आरक्षित वर्गातील उमेदवाराला शुल्कात सूट देण्यात आली असून त्यांना केवळ 175 रुपये शुल्क भरावं लागेल.


IBPS SO Recruitment 2023 : वयोमर्यादा


या भरती अंतर्गत विविध पदासाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना वाचा.


IBPS SO Recruitment 2023 : कशी असेल निवड प्रक्रिया?


या भरतीसाठी निवड प्रक्रिया प्रवेशस परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या प्रकारे करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराने अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर तपशील पाहावा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Talathi Bharati 2023 : मोठी बातमी! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती; सरकारने काढले आदेश