IBPS PO Notification 2022 Out : बँकेत नोकरीची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. 6000 हून अधिक पदांवर बंपर भरती सुरु झाली आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) पीओ (PO) म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) आणि इतर पदांवर भरती प्रक्रिया जारी केली आहे. या भरतीअंतर्गत सहा हजारांहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. आजपासून या भरती प्रक्रियेला सुरुवाता झाली आहे. इच्छुक उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात. या वेबसाईटवर तुम्हाला भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळेल. 


आईबीपीएसने (IBPS) भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत पीओ (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी यासारख्या अन्य पदांवर भरती करण्यात येईल. आज 2 ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे. बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांनी ही संधी सोडू नये.


महत्त्वाच्या तारखा 



  • अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 2 ऑगस्ट 2022

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022 


रिक्त जागांचा तपशील


या रिक्त पदांद्वारे एकूण 6432 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज केलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 2596 पदांवर भरती होणार आहे. याशिवाय ओबीसीसाठी 1741, EWS श्रेणीतील 616 पदे, SC साठी 996 आणि ST साठी 483 पदांसाठी भरती होणार आहे.


'या' बँकांमध्ये नोकरीची संधी



  • बँक ऑफ इंडिया BOI : 535 पदे

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 2500 पदे

  • पंजाब नॅशनल बँक PNB : 500 पदे

  • पंजाब अँड सिंध बँक : 253 पदे

  • UCO बँक : 550 पदे

  • युनियन बँक ऑफ इंडिया : 2094 पदे


वयोमर्यादा


या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचं कमाल 20 वर्षे (1 ऑगस्ट 2022 पर्यंत) आणि कमाल वयोमर्यादा 30 असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट असेल.


शैक्षणिक पात्रता


या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केलेलं असावं.


निवड प्रक्रिया


उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल - प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. प्राथमिक परीक्षा 60 मिनिटांच्या कालावधीसाठी घेतली जाईल आणि 100 गुण असतील. परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार 3 तास कालावधी आणि 200 गुणांच्या मुख्य परीक्षेत बसण्यास पात्र असतील.


अर्जाची फी


SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज फी/सूचना शुल्क रु. 175 आहे, तर इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी ते रु. 850 आहे.