Railway jobs : रेल्वेमध्ये नोकरी (Railway job) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रेल्वेमध्ये विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway) भर्ती सेलने गट क आणि गट ड च्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत वेबसाइट rrcpryj.org ला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. म्हणजे अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत.
वयोमर्यादा किती?
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावे. 1 जानेवारी 2025 रोजी वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 33 वर्षांची अट आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणं गरेजचं आहे. कारण, अर्ज करण्याची मुदत आज संपणार आहे. त्यामुळं अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत.
अर्ज करण्यासाठी किती शुल्क?
या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, अपंग, महिला, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. लेखी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत केले जाईल, तर इतर सर्व श्रेणींसाठी परीक्षा शुल्क 500 रुपये आहे. त्यापैकी 400 रुपये परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना परत केले जातील.
कसा कराल अर्ज?
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटला rrcpryj.org भेट द्या
आता उमेदवाराच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करा
उमेदवारांनी प्रथम नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी.
नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
त्यानंतर उमेदवाराने विहित शुल्क जमा करू शकतो.
आता अर्ज डाउनलोड करा
त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी
दरम्यान, रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त तरुणांनी यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वेने सुरु केलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकची माहिती हवी असेल तर rrcpryj.org या बेवसाईटवर तुम्हाला माहिती पाहता येणार आहे. या बेवसाईटवर जागांच्या संदर्भातील सगळे तपशील दिले आहेत.