​Gail India Limited Jobs 2022 : गेल इंडिया लिमेटेडने (GAIL India Limited) भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, GAIL India विशेष भरती मोहिमेअंतर्गत अनेक पदं भरणार आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना GAIL India Limited ची अधिकृत वेबसाईट gailonline.com ला भेट द्यावी लागेल. भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2022 आहे.


रिक्त पदं



  • किती पदांची भरती होणार : 77 पदं

  • SC/ST/OBC उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम : 51 पदं

  • PwBD उमेदवारांसाठी विशेष भर्ती ड्राईव्ह : 26 पदं


पात्रतेचे निकष 


उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत अधिसूचना सूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.


अर्ज शुल्क 


OBC (NCL) प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर, SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारमधील सक्षम प्राधिकाऱ्यानं जारी केलेल्या प्रमाणपत्राची खरी प्रत सादर करण्याच्या अधीन राहून अर्ज शुल्क भरण्यापासून सूट दिली जाते.


निवड प्रक्रिया


उमेदवारांची निवड लेखी चाचणी/व्यापार चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च दिला जाणार नाही.


भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती  


कोणत्याही समस्येचा सामना करणारे उमेदवार त्यांचे प्रश्न अधिकृत ईमेल career@gail.co.in वर पाठवू शकतात. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, या भरती मोहिमेशी संबंधित फक्त त्या प्रश्नांची उत्तरे मेलवर दिली जातील. 


भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा 


अर्ज प्रक्रिया सुरु करण्याची तारीख : 16 सप्टेंबर 2022 
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2022 





अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :