EPFO Recruitment 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संघटनेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर संधी अजिबात गमावू नका. EPFO कडून भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही इच्छुक असाल तर अजिबात वेळ न घालवता झटपट अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे, बारावी आणि पदवीधरांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे 2800 हून अधिक पदं भरण्यात येणार आहेत.


'या' वेबसाईटवरून अर्ज करा


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतील या भरतीसाठी फक्त ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी, तुम्हाला EPFO ​​च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. epfindia.gov.in हे संकेतस्थळ आहे.  या संकेतस्थळावरून उमेदवारांनी अर्ज दाखल करावा. 


महत्त्वाच्या तारखा 


EPFO च्या या पदांसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज 27 मार्च 2023 पासून सुरू होतील आणि त्यांच्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 2859 पदं भरली जातील. यापैकी 2674 पदं सामाजिक सुरक्षा सहाय्यक तर 185 पदं लघुलेखक पदासाठी आहेत. 


कोण अर्ज करण्यास पात्र?


नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले उमेदवार सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदासाठी अर्ज करू शकतात. दुसरीकडे, मान्यताप्राप्त बोर्डाचे बारावी उत्तीर्ण उमेदवार स्टेनोग्राफरच्या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासोबतच सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदासाठी उमेदवाराला इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिटं आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिटं असा टायपिंग स्पीड असावा. स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराला डिक्टेशन आणि टायपिंगचा स्पीड 80 शब्द प्रति मिनिट असावा. तपशीलवार जाणून घेण्यासाठी तुम्ही सूचना तपासू शकता. 


वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि वेतनश्रेणी 


ईपीएफओ पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असावं. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.


या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, टायपिंग चाचणी आणि स्टेनो कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. पदानुसार परीक्षा घेतल्या जातील. निवड झाल्यास सोशल सिक्योरिटी असिस्टेंटला दरमाहा 29,200 ते 92,300 रुपये मिळतील. तर स्टेनोग्राफरला 25,500 ते 81,100 रुपये पगार मिळेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Job Majha : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज