ESIC Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा निगमने (ESIC) डॉक्टरांच्या विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार esic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचू शकतात. या पदांवर थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार ESIC डॉक्टर भरती 2022 साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.
रिक्त पदांचे तपशील जाणून घ्या
कर्मचारी राज्य विमा निगमने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेअंतर्गत वरिष्ठ निवासी 13 पदं, वरिष्ठ निवासी (कंत्राटी) 11 पदं, स्पेशलिस्ट 1 पद आणि सुपर स्पेशालिस्टसाठी 3 रिक्त पदांची भरती केली जाईल.
पगार किती असेल?
वरिष्ठ निवासी पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 67,700 रुपये आणि स्पेशलिस्ट पदांसाठी 1,30,797 पर्यंत पदानुसार पगार दिला जाईल.
काय आहे शैक्षणिक पात्रता?
वरिष्ठ निवासी पदावरील भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीबीएस (MBBS) आणि संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावं. त्याचबरोबर स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट या पदांसाठी उमेदवाराचे कमाल वय ७० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अधिक तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
मुलाखतीची तारीख जाणून घ्या
या भरती अंतर्गत वरिष्ठ निवासीसह इतर पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठीची मुलाखत 23 जून आणि 24 जून 2022 रोजी घेतली जाईल. पात्र आणिध इच्छुक उमेदवार अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर इतर आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- NFR Railway Recruitment 2022 : रेल्वेत 5000 हून अधिक पदांवर बंपर, जाणून घ्या अर्ज कुठे आणि कसा कराल?
- NPL Recruitment 2022: नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये अनेक पदांसाठी रिक्त जागा, 3 जुलैपर्यंत करा अर्ज
- CSIR CLRI Recruitment 2022 : CSIR मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती, अर्जदारांसाठी 'या' पात्रतेच्या अटी