DRDO Job Vacancy : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असाल तर ही बातमी नक्की वाचा. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (Defence Research & Development Organisation) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही ही DRDO मधील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास, तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता. drdo.gov.in. या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही रेजिस्ट्रिशन करु शकता. या भरती अंतर्गत 102 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.


DRDOमध्ये विविध पदांवर भरती 


डीआरडीओ भरतीअंतर्गत विविध भरती करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेत भांडार अधिकारी (Store Officer), प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) आणि खाजगी सचिव (Private Secretary) या पदांवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे म्हणजे 56 वर्षांपर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.


DRDO Job : रिक्त पदांचा तपशील


या भरती मोहिमेअंतर्गत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने उमेदवारांना तीन वर्षांच्या कराराच्या आधारावर भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 102 पदांपैकी स्टोअर ऑफिसरच्या 17 जागा, प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 20 जागा आणि खाजगी सचिव पदाच्या 65 जागा रिक्त आहेत.


DRDO Vacancy : वयोमर्यादा


DRDO मध्ये या भरतीसाठी उमेदवारांचं वय 12 जानेवारी 2024 रोजी 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं.


DRDO Vacancy : शैक्षणिक पात्रता


DRDO भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणं आवश्यक आहे. खाजगी सचिवांच्या 65 पदांवर भरती होणार आहे. याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 20 आणि स्टोअर ऑफिसरच्या 17 पदांवर भरती होणार आहे.


DRDO Recruitment 2023 : किती पगार मिळेल?


DRDO ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निवड झालेल्या सर्व उमेदवारांना वेतन स्तर 7 अंतर्गत वेतन दिलं जाईल. पाच वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर मूळ वेतन 35,400 रुपयांवरून 1,12,400 रुपये होईल. याशिवाय इतर सरकारी भत्त्यांचा लाभ दिला जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना पाहू शकता.


DRDO भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काय करावं?



  • या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वात आधी drdo.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर वेबसाइटवरील होम पेजवर Careers with DRDO लिंक वर क्लिक करा.

  • आता DRDO Recruitment for Various Post च्या पर्यायावर क्लिक करा.

  • नोंदणीसाठी आवश्यक माहिती करून रेजिस्ट्रेशन करा.

  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा. 

  • अर्ज दाखल केल्यानंतर प्रिंट घ्यायला विसरु नका.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Income Tax Job : आयकर विभागात बंपर भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात; वाचा अधिक माहिती