DRDO Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


DRDO म्हणजेच, डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशनने जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF - Junior Research Fellowship) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. DRDO (Defense Bioengineering and Electro Medical Laboratory) भरती अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे. इच्छुक उमेदवार hrd.debel.debel@gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 01 जुलैपासून सुरु झाली आहे. 


रिक्त जागांचा तपशील
या भरती अंतर्गत 7 पदांवर भरती करण्यात येणार आहे.


शैक्षणिक पात्रता
जूनियर रिसर्च फेलोशिप (Junior Research Fellowship) पदांसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून संबंधित विषयामध्ये पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेले असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेमध्ये पाच वर्ष आणि मागवर्गीयांना दोन वर्षाची सूट देण्यात येईल.


किती स्टायपेंड मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 31 हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल.


कशी असेल निवड प्रक्रिया?
जूनियर रिसर्च फेलोशिप (Junior Research Fellowship) पदासाठी मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.


येथे अर्ज करा
इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जुलै 2022 पर्यंत hrd.debel.debel@gov.in या ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.


सविस्तर माहितीसाठी उमेदवार येथे क्लिक करुन अधिसूचना पाहू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या