BHEL Jobs 2024: तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडनं (BHEL) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत, त्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट hwr.bhel.com वर जाऊन त्वरित अर्ज करावा. भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? यांसारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. तर त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून आहे. 


भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडनं भरती प्रक्रियेसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे एकूण 170 पदं भरली जातील. ज्यामध्ये अभियांत्रिकी, बांधकाम, सर्व्हिसिंग, उत्पादन, डिझाइन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित पदांचा समावेश आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी आणि NCVT संस्थेद्वारे मान्यताप्राप्त ITI अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 


BHEL Jobs 2024 : भरती प्रक्रियेसाठी आवश्यक वयोमर्यादा काय? 


भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे. प्रचारासाठी अर्ज करणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष असावं. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी  18 ते 32 वर्षांदरम्यान ठेवण्यात आलं आहे.  


BHEL Jobs 2024: कशी केली जाईल निवड? 


भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), हरिद्वार येथे ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी लेखी परीक्षा होईल. उमेदवारांचं मूल्यांकन त्यांच्या रिझल्ट आणि कामगिरीच्या आधारे केलं जाईल.


BHEL Jobs 2024: अर्ज करण्यासाठी काय कराल? 


स्टेप 1: अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या hwr.bhel.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 
स्टेप 2: त्यानंतर होम पेजवर जाऊन 'करियर' सेक्शनवर क्लिक करा.
स्टेप 3: त्यानंतर उमेदवार BHEL अप्रेंटिसशिप भरती 2024 लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: त्यानंतर रजिस्ट्रेशन करा. 
स्टेप 5: आता उमेदवारांनी अर्ज भरावा.
स्टेप 6: यानंतर उमेदवार आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. 
स्टेप 7: आता उमेदवारांनी फॉर्म सबमिट करावा.
स्टेप 8: त्यानंतर उमेदवार अर्ज डाऊनलोड करावा. 
स्टेप 9: शेवटी, उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट घ्यावी.


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.