Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच एआय टेक्नॉलॉजीचा (AI Technology) ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या टेक्नॉलॉजीचा (Technology) वापर आणि क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात एआय हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारं तंत्रज्ञान असू शकतं, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. याच कारणामुळे आजकाल प्रत्येक क्षेत्रात एआय टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच, एआयमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये कोणती पात्रता असायला हवी? त्यांचा पगार किती असतो? हा तुम्हा-आम्हाला पडणारा अगदी सामान्य प्रश्न आहे. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
एआय नोकऱ्यांची वाढती मागणी
एआय नोकऱ्यांची वाढती मागणी पाहता जगभरातील अनेक देशांतील सरकार आणि मोठ्या टेक कंपन्यांनी भारतातील लोकांना AI चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स हे नुकतेच भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली की, त्यांची कंपनी भारतातील लाखो लोकांना AI प्रशिक्षण देणार आहे. तसेच, भविष्यात भारताला AI टेक्नॉलॉजीचं केंद्र बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
भारतासह जगभरातील अनेकांना AI त जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. त्यापैकी सर्वात उत्सुकता अशी आहे की AI जॉब करणाऱ्या लोकांना किती पगार मिळतो? याविषयी समोर आलेल्या एका ताज्या अहवालाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
AI नोकऱ्या करणाऱ्या लोकांचा पगार
प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म AON ने जारी केलेल्या ताज्या डेटामध्ये असे दिसून आले आहे की, AI टेक्नॉलॉजी आणि मशीन लर्निंगमध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्षेत्रात AI जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराबद्दल जाणून घेऊयात.
- AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा ML (मशीन लर्निंग) कर्मचाऱ्यांना IT सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये 0-5 वर्षांचा अनुभव आहे, त्यांना सरासरी वार्षिक 14 ते 18 लाख रुपयांचे पॅकेज मिळते. अशा प्रकारे, त्यांचा मासिक पगार साधारण 1-1.50 लाख रुपयांपरयंत असू शकतो.
- GCC क्षेत्रातील AI आणि ML कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक 16-20 लाख रुपयांचे पॅकेज मिळते.
- उत्पादन कंपन्यांमधील AI आणि ML क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक 22 ते 26 लाख रुपयांचे पॅकेज मिळते.
- याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना AI आणि ML क्षेत्रात 10-15 वर्षांचा अनुभव आहे त्यांना सरासरी वार्षिक 44-96 लाख रुपयांचे पॅकेज असते.
महत्त्वाच्या बातम्या :