मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या भारत अर्थ मूव्हर्स (BEML) या संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल, ITI ट्रेनी- मशीनिस्ट, ITI ट्रेनी- टर्नर आणि स्टाफ नर्स या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? यासंदर्भात सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात...
भारत अर्थ मूव्हर्स लि
डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल
शैक्षणीक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 52
वयाची अट: 29 ते 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
-----
ITI ट्रेनी- मशीनिस्ट
शैक्षणीक पात्रता : ITI (मशीनिस्ट)
एकूण जागा - 16
वयाची अट: 29 ते 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
-----
ITI ट्रेनी- टर्नर
शैक्षणीक पात्रता : ITI (टर्नर)
एकूण जागा - 16
वयाची अट: 29 ते 30 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
----
स्टाफ नर्स
शैक्षणीक पात्रता : B.Sc (नर्सिंग) किंवा SSLC+GNM
एकूण जागा - ०१
वयाची अट: २९ ते ३० वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ ऑक्टोबर २०२३
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
-----
https://drive.google.com/file/d/10YdboZbybefc3v8AmCus3XN6lfeAgtuB/view
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
हेही वाचा :
Job Majha : जळगाव महानगरपालिकेत नोकरीची संधी; झटपट करा अर्ज, रिक्त पदं अन् वेतन किती?