VAYU CYCLONE Updates : वायू वादळाने दिशा बदलली, धोका टळला

वायू वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता कमी झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2019 09:37 AM
वायू चक्रीवादळाने दिशा बदलली, धोका टळला, मात्र जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता. वायू वादळाची ओमानच्या दिशेने वाटचाल
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायू चक्रीवादळ गिर-सोमनाथ, पोरबंदर, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका आणि कच्छमध्ये परिणामकारक असेल. या परिसरात दुपारी 170 ते 180 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
वायू चक्रवादळाचा गुजरात किनारपट्टीलगतच्या भागावर परिणाम दिसणे सुरु झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराचे छत उडून गेले आहे.
वायू चक्रवादळाचा गुजरात किनारपट्टीलगतच्या भागावर परिणाम दिसणे सुरु झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराचे छत उडून गेले आहे.

पार्श्वभूमी

गांधीनगर : अरबी सुमद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी आपली दिशा बदलून गुजरातच्या दिशेने आगेकूच केली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असून, काही वेळात गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देणार आहे. या वादळाशी दोन हात करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहे. दरम्यान या वादळामुळे गुजरातला जाणाऱ्या 70 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या किनारपट्टीला वायू वादळाचा धोका नाही. तरीही मच्छिमारांनी आज आणि उद्या खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गुजरातमध्ये हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तेथे हाय अलर्ट जारी केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित स्थानी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या चक्रीवादळामुळे गुजरातमधील समुद्राला जोडलेल्या नद्यांमधील पाण्याचा स्तर वाढला आहे. त्यामुळे किनाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

ओदिशाला फेनी वादळाचा मोठा तडाखा बसला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्यावेळी ओदिशामध्ये काय उपाययोजना करण्याची आल्या होत्या, याच्या माहितीसाठी गुजरातमधील संबधित अधिकारी ओदिशा सरकारच्या संपर्कात आहेत.

कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री विविध ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली.

13 आणि 14 तारीख आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही सेना, एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि इतर विभागांकडून मदत मागितली आहे. जीवितहानी टाळण्यासाठी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे, अशी माहिती विजय रुपाणी यांनी दिली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.