LIVE BLOG : मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप, पर्रिकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी
प्रमोद सावंत यांच्या नावावर सहमतीसाठी भाजपकडून दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
तत्पूर्वी लष्कराच्या जवानांनी दिली सलामी
देवेंद्र फडणवीसांकडून मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
प्रमोद सावंत यांच्या नावावर सहमतीसाठी भाजपकडून दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर प्रमोद सावंत यांच्या नावावर सहमती झाली नाही, तर नाईलाजाने सरकार पाडावं लागेल, असा इशारा भाजपने एमजीपी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एमजीपीचे सुधीन ढवळीकर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई यांच्या भेटीसाठी पोहोचले. भेटीची ही दुसरी फेरी आहे.
पार्श्वभूमी
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी (17 मार्च) रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. अखेर त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज, 18 मार्च रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
- सकाळी 9.30 ते 10.30 पर्यंत मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी येथील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल.
- सकाळी 10.30 वाजता पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी येथे हलवले जाईल.
- 11 ते 4 वाजेपर्यंत सामान्य लोकासांठी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल.
- दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कारासाठी मीरामार इथे पर्रिकर यांचे पार्थिव हलवले जाईल.
- 4.30 वाजता अंतिम विधी सुरु होईल.
- सायंकाळी 5 वाजता पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील.
लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन
रविवारी सकाळी मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून मनोहर पर्रिकर यांना झोपूनच राहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळपेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती काहीशी सुधारली होती. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज रविवारी अपयशी ठरली. दरम्यान, पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
- संपूर्ण नाव : मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर
- गोव्यातल्या म्हापसामध्ये जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी जन्म
- लोलोला हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण
- मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण
(पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि पहिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले)
- विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत
- 1994 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले
- 2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले
- त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये (2001) ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचं सरकार केवळ दीड वर्ष टिकले
- जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले
- 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले
- पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं
- 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली.
- पर्रिकर संरक्षणमंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला
- गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
- 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- 2018 मध्ये पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले
संबंधित बातम्या
लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -