Loksabha Election 2019 7th phase : दुपारी 2 वाजेपर्यंत 41.41 टक्के मतदान
लोकसभा निवडणूक, सातव्या टप्प्यातील मतदान, दुपारी 2 वाजेपर्यंत 41.41 टक्के मतदान
▪️बिहार - 36.20 टक्के
▪️हिमाचल प्रदेश - 43.68 टक्के
▪️मध्य प्रदेश - 46.03 टक्के
▪️पंजाब - 37.89 टक्के
▪️उत्तर प्रदेश - 37.00 टक्के
▪️पश्चिम बंगाल - 49.79 टक्के
▪️झारखंड - 52.89 टक्के
▪️चंदीगड - 37.50 टक्के
▪️बिहार - 18.90 टक्के
▪️हिमाचल प्रदेश - 27.62 टक्के
▪️मध्य प्रदेश - 29.48 टक्के
▪️पंजाब - 23.45 टक्के
▪️उत्तर प्रदेश - 23.16 टक्के
▪️पश्चिम बंगाल - 32.15 टक्के
▪️झारखंड - 31.39 टक्के
▪️चंदीगड - 22.30 टक्के
▪️बिहार - 17.94 टक्के
▪️हिमाचल प्रदेश - 15.66 टक्के
▪️मध्य प्रदेश - 16.28 टक्के
▪️पंजाब - 15.65 टक्के
▪️उत्तर प्रदेश - 14.43 टक्के
▪️पश्चिम बंगाल - 21.11 टक्के
▪️झारखंड - 23.86 टक्के
▪️चंदीगड- 10.40 टक्के
▪️बिहार - 10.65 टक्के
▪️हिमाचल प्रदेश - 2.80 टक्के
▪️मध्य प्रदेश - 11.63 टक्के
▪️पंजाब - 9.67 टक्के
▪️उत्तर प्रदेश - 7.41 टक्के
▪️पश्चिम बंगाल - 14.11 टक्के
▪️झारखंड - 15.16 टक्के
▪️चंदीगड- 10.40 टक्के
पार्श्वभूमी
नवी दिल्ली : लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. सातव्या टप्प्यात एकूणण 59 जागांवह हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
सातव्या टप्प्यात सात राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे. यामध्ये बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज वाराणसीमध्येही मतदान होणार आहे, याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सामना काँग्रेसच्या अजय राय, एसपी-बीएसपी-आरएलडी महाआघाडीच्या शालिनी यादव यांच्याशी होणार आहे. याठिकाणी एकूण 25 उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत.
सातव्या टप्प्यातील 'स्टार वॉर'
बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटीवर मैदानात असून त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं आव्हान असणार आहे. पंजाबच्या गुरूदासपूरमधून अभिनेता सनी देओलला भाजपने उमेदवारी दिली आहे. सनी देओलच्या विरोधात काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुनील जाखड मैदानात आहेत. चंदीगडमधून भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर आणि काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पवन कुमार बन्सल यांच्यामध्ये सामना होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये 9 जागांसाठी मतदान
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये 9 जागांवर मतदान होत आहे. कोलकाता उत्तर आणि कोलकात दक्षिण दमदम, बारासात, बशीरहाट, जाधवपूर, डायमंड हार्बर, जयनगर आणि मथुरापूर या नऊ मतदार संघात एकूण 111 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -