LIVE UPDATE : जगभरात योग दिनाचा उत्साह
जगभरात आज तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनऊमध्ये हजेरी लावली आहे. गेल्या 3 वर्षांपासून पंतप्रधान या कार्यक्रमाला मोठं महत्त्व देत आहेत. लखनौमध्ये होत असलेल्या योग कार्यक्रमाला पंतप्रधानांसह यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक, श्रीपाद नाईक यांच्यासह 300 मुस्लीम महिला सहभागी झाल्या आहेत. तर इकडे मुंबईतही मुख्यमंत्र्यांनी योगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. वांद्र्यातील प्रोमोनाड इथल्या 150 फूट उंच झेंड्याजवळ हा कार्यक्रम सुरु आहे. इथे मुख्यमंत्र्यांसोबत आशिष शेलार, पूनम महाजन उपस्थित आहेत.
Continues below advertisement
Background
जगभरात आज तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखनऊमध्ये हजेरी लावली आहे. गेल्या 3 वर्षांपासून पंतप्रधान या कार्यक्रमाला मोठं महत्त्व देत आहेत. लखनौमध्ये होत असलेल्या योग कार्यक्रमाला पंतप्रधानांसह यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक, श्रीपाद नाईक यांच्यासह 300 मुस्लीम महिला सहभागी झाल्या आहेत.
तर इकडे मुंबईतही मुख्यमंत्र्यांनी योगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. वांद्र्यातील प्रोमोनाड इथल्या 150 फूट उंच झेंड्याजवळ हा कार्यक्रम सुरु आहे. इथे मुख्यमंत्र्यांसोबत आशिष शेलार, पूनम महाजन उपस्थित आहेत.
Continues below advertisement
10:09 AM (IST) • 21 Jun 2017
10:02 AM (IST) • 21 Jun 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळीमध्ये सपत्नीक योग केला. वरळीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत योगाचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे मुख्यमंत्र्यांसह पत्नी अमृता फडणवीस आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीही हजेरी लावली.
09:05 AM (IST) • 21 Jun 2017
09:05 AM (IST) • 21 Jun 2017
भारतीय नौदलही आज योग उत्सव साजरा करत आहे. मुंबईच्या समुद्रात उभ्या असलेल्या आयएनएस विराटवर नौदलाच्या जवानांनी योगाभ्यास करत या मोहिमेत भाग घेतला.
09:00 AM (IST) • 21 Jun 2017
08:58 AM (IST) • 21 Jun 2017
08:59 AM (IST) • 21 Jun 2017
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ग्रेट ऑफ चायना अर्थात चीनच्या भिंतीवरही योगासानं करण्यात आली. इथे चायनीज आणि भारतीय योग अभ्यासक एकत्र आले आणि योग केला. बीजिंगमध्येही हजारो योग अभ्यासकांनी योगासनांची प्रात्यक्षिकं केली.
08:54 AM (IST) • 21 Jun 2017
08:56 AM (IST) • 21 Jun 2017
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरात योग
08:50 AM (IST) • 21 Jun 2017
08:49 AM (IST) • 21 Jun 2017
नेहमी मुंबईकरांच्या पोटाची भूक भागवणाऱ्या डब्बेवाल्यांनी योगदिनाच्या पूर्वसंध्येलाच योगाभ्यास केला. सकाळचा वेळ हा डब्बेवाल्यांच्या कामाचा असल्याने त्यांनी आदल्या दिवशीच योगाभ्यास करुन या उत्सवात सहभाग घेतला. वर्सोव्याच्या समुद्रकिनारी आसने करुन डब्बेवाल्यांनी या उत्सवात सहभाग नोंदवला.
08:43 AM (IST) • 21 Jun 2017
08:42 AM (IST) • 21 Jun 2017
आयटीबीपी जवानांचा लडाखमध्ये -25 अंश सेल्सिअस तापमानात योग
08:32 AM (IST) • 21 Jun 2017
08:42 AM (IST) • 21 Jun 2017
08:31 AM (IST) • 21 Jun 2017
भाजप नेत्या शायना एन सी, अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेता अरबाज खान यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्हवर योगासनं केली
08:18 AM (IST) • 21 Jun 2017
08:15 AM (IST) • 21 Jun 2017
08:17 AM (IST) • 21 Jun 2017
भारतीय नौदलाच्या जवानांचा बंगालच्या उपसागरात योग
08:09 AM (IST) • 21 Jun 2017
08:08 AM (IST) • 21 Jun 2017
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगासनं केली
08:06 AM (IST) • 21 Jun 2017
08:03 AM (IST) • 21 Jun 2017
गुजरातमधील अहमदाबादमध्येही खुद्द योगगुरु रामदेवबाबांनी योगासनं केली. त्यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शाहांनीसुद्धा आपलं योग कौशल्य आजमावलं.
08:02 AM (IST) • 21 Jun 2017
08:01 AM (IST) • 21 Jun 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लखनौमध्ये योग
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा