LIVE BLOG : सुषमा स्वराज यांचे पार्थिव अनंतात विलीन

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Aug 2019 10:33 PM
कोल्हापुरातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरणातील सात क्रमांकाचा दरवाजा उघडला, धरणातून 14,540 प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली भागाचा उद्या दौरा करणार, सूत्रांची माहिती, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीचा आढावा घेणार


निवासी डॉक्टरांच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मार्डकडून संपावर न जाण्याचं लेखी आश्वासन दिलं असतानाही संप, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत कोर्टाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल संपकरी डॉक्टरांवर कारवाईची याचिकेत मागणी
महाविद्यालयाच्या निवडणुका पुढे ढकलल्या, राज्य सरकारचा निर्णय, विधानसभा निवडणुकीनंतर होणार निवडणुका
#BREAKING
ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत,
महालक्ष्मी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड
सुषमा स्वराज यांचे पार्थिव अनंतात विलीन,
दिल्ली : लोथी रोडच्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार
सोन्याचा भावात विक्रमी वाढ, सोन्याचे भाव प्रतितोळे 37,920 रुपयांवर, तर चांदीचे दर प्रतिकिलो 43,670
सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
पंढरपूरला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पुलावर पाणी , सोलापूर, अहमदनगर, विजापूर मार्ग बंद, वारकऱ्याला काढले यशस्वी बाहेर
रायगड : महाड-पुणे रस्त्यावरील वरंध घाटांमध्ये माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प, प्रशासनामार्फत जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस बंदोबस्त
सुषमा स्वराज यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, थोड्याच वेळात अंतिम संस्कार होणार
गोवा : आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे तर उपाध्यक्षपदी संजय सातार्डेकर यांची नियुक्ती, भाजप प्रवेशानंतर सुभाष शिरोडकर यांची झाली होती नियुक्ती, पोटनिवडणूक लढवत असताना शिरोडकर यांनी सोडले होते पद, त्यानंतर अध्यक्षपद होते रिक्त
गोवा : गेले 5 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हादई, वेळूस,मोर्ले आणि वाळवंटी नद्या दुथडी भरून वाहत असून सत्तरी तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाणूस-वाळपई आणि फोंडा-वाळपई रस्ते पाणी आल्याने ठप्प, विद्यार्थी शाळेत पोहोचू न शकल्याने शाळांना सुट्टी, काही ठिकाणी परीक्षा देखील रद्द
राज्यातील निवासी डॉक्टराचा बेमुदत संप, जेजे मध्येही हातात मागण्याचे फलक घेऊन सरकारविरोधात निदर्शने
सुषमा स्वराज यांचं पार्थिव शरीर भाजप मुख्यालयात, अडीच वाजेपर्यंत अंतिम दर्शन
सुषमा स्वराज यांना राज्यसभेत वाहिली श्रद्धांजली
भाजपचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
मुंबई : हिंदीतील ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक जे ओमप्रकाश यांचं निधन झालं, ते 92 वर्षांचे होते. जे ओमप्रकार हे राकेश रोशन यांचे सासरे तर हृतिक रोशनचे आजोबा होते. त्यांनी अपनापन, आपकी कसम, आखिर क्यों.. या सिनेमांचं दिग्दर्शन तर आई मिलन की बेला, आया सावन झूम के इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंत्यदर्शन घेतले, अंत्यदर्शनावेळी मोदी गहिवरले
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंत्यदर्शन घेतले,
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही घेतले अंतिम दर्शन
सुषमा स्वराज यांचं पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार, सकाळी 11 पर्यंत निवासस्थानी तर 12 ते 3 पर्यंत भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार
देशाच्या राजकारणातील झळाळता अध्याय संपला, स्वराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, तर उत्तम मार्गदर्शक गमावल्याची अनेक नेत्यांची भावना

पार्श्वभूमी

१. देशाच्या राजकीय इतिहासातील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपलं, हृदयविकाराच्या झटक्यानं सुषमा स्वराज यांचं निधन, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

२. सुषमा स्वराज यांचं पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार, सकाळी 11 पर्यंत निवासस्थानी तर 12 ते 3 पर्यंत भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार

३. देशाच्या राजकारणातील झळाळता अध्याय संपला, स्वराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, तर उत्तम  मार्गदर्शक गमावल्याची अनेक नेत्यांची भावना

४. कलम-370 मुक्त जम्मू-काश्मीरचं भाजपचं स्वप्न साकार, राज्यसभेनंतर लोकसभेतही 370 रद्द करण्याचं विधेयक मंजूर, अमित शाहांकडून विरोधकांचा समाचार

५. शिवसेना खासदार संजय राऊतांचे पोस्टर्स इस्लामाबादेत झळकले, राऊतांच्या बलुचिस्तानबद्दलच्या विधानाचे पाकिस्तानमध्ये पडसाद

६. कोल्हापुरात पावसानं सर्व विक्रम मोडले,बचावकार्यासाठी लष्कर दाखल, सांगली, साताऱ्यासह महाडमध्ये महापूर, पुढील 72 तास मुसळधार पावसाचा इशारा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.