LIVE BLOG : विंग कमांडर अभिनंदन यांचं देशवासियांकडून सोशल मीडियावरुन स्वागत

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले आहेत. तब्बल 60 तासांच्या प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी डेरेदाखल झाले. अभिनंदन यांच्या पुनरागमनानंतर वाघा बॉर्डरवर एकच जल्लोष झाला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Mar 2019 11:39 PM

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत. भारताला तुमच्या हिमतीचा अभिमान आहे. तुम्हाला आणि वायुसेनेला भविष्यातही यश लाभो

विंग कमांडर अभिनंदन तुमचं मायदेशी स्वागत. तुमच्या असामान्य शौर्याचा देशाला अभिमान आहे. आपलं सैन्यदल 130 कोटी भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत

60 तासांच्या प्रतीक्षेनंतर विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले
60 तासांच्या प्रतीक्षेनंतर विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले
60 तासांच्या प्रतीक्षेनंतर विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले
60 तासांच्या प्रतीक्षेनंतर विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल
अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्यात पाकिस्तानकडून दिरंगाई, अद्याप वाघा बॉर्डरवर पोहचलेच नाहीत
अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्यात पाकिस्तानकडून दिरंगाई, अद्याप वाघा बॉर्डरवर पोहचलेच नाहीत
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मायदेशात परतण्यासाठी आठ वाजण्याची शक्यता, पाकिस्तानी मीडियाचं वृत्त, अभिनंदन यांच्या आगमनानंतर एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर पत्रकार परिषद घेणार
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं पाकिस्तानकडून भारताकडे प्रत्यावर्तन
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं पाकिस्तानकडून भारताकडे प्रत्यावर्तन
पाकिस्तानकडून बीटिंग द रीट्रीट सेरेमनी रद्द नाही. केवळ भारताकडून अभिनंदन यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा बॉर्डरवरील बीटिंग द रीट्रीट सेरेमनी रद्द. त्यामुळे बीटिंग द रीट्रीट सेरेमनीनंतर अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द करण्याचा पाकिस्तानचा मानस

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर दाखल
एअर वाईस मार्शल आर जी के कपूर विंग कमांडर अभिनदंन यांच्या मायदेशी स्वागताला उपस्थित राहणार
अभिनंदन यांच्या स्वागतासाठी अधिकारी वाघा बॉर्डरवर दाखल, सेनेच्या चार गाड्या वाघा बॉर्डरवर. अभिनंदन यांचे कुटुंबीयही वाघा बॉर्डरवर पोहचले
अभिनंदन यांच्या स्वागतासाठी अधिकारी वाघा बॉर्डरवर दाखल, सेनेच्या चार गाड्या वाघा बॉर्डरवर. अभिनंदन यांचे कुटुंबीयही वाघा बॉर्डरवर पोहचले
अभिनंदन इस्लामाबादहून लाहोरला जात असल्यामुळे पोहचण्यास उशीर
विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर गर्दी
वैमानिक अभिनंदन यांना वायूसेनेच्या विमानाने परत आणण्याची भारताची मागणी पाकिस्तानने फेटाळली : सूत्र
वैमानिक अभिनंदन यांना वायूसेनेच्या विमानाने परत आणण्याची भारताची मागणी पाकिस्तानने फेटाळली : सूत्र
वाघा बॉर्डरवर आज बीटिंग रिट्रीट सोहळा होणार नाही. भारतीय वायू दलाचे वरिष्ठ अधिकारी विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागताला हजर राहतील, अमृतसरचे उपायुक्त शिव दुलार सिंह धिल्लो यांची माहिती
भारतीय वायुसेनेच्या दोन गाड्या अटारी बॉर्डरवर दाखल

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : भारताचा ढाण्या वाघ अखेर आज भारतात परत येणार आहे. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल (28 फेब्रुवारी) पाकच्या संसदेत केली. त्यानंतर आज अभिनंदन यांना वाघा बॉर्डरद्वारे भारतात आणलं जाणार असल्याचं कळतं.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या इस्लामाबादमध्ये आहेत. आज दुपारी त्यांना लाहोरला आणलं जाईल. त्यांना आज वाघा बॉर्डरवरुन भारतात पाठवलं जाईल. यावेळी भारतीय अधिकारी ग्रुप कॅप्टन जेडी कुरियनही त्यांच्यासोबत असतील. परंतु अभिनंदन यांच्या परतीची वेळ सध्या निश्चित नाही.

बीटिंग रिट्रीट सोहळ्यादरम्यान अभिनंदनला भारताकडे सोपवलं जावं, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. परंतु पाकिस्तानने अभिनंदनला दुपारपर्यंत सोपवावं, असा भारताचा आग्रह आहे. भारतात परतल्यानंतर वैमानिक अभिनंदन यांना अमृतसरच्या हवाईतळावर नेलं जाईल. यानंतर त्यांना अमृतसरहून दिल्लीला पाठवलं जाईल.

वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा परतीचा प्रवास कसा असेल?

भारताच्या कूटनीतीचा विजय
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीत देशाच्या कूटनीतीचा मोठा विजय झाला आहे. भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना केवळ 24 तासांच्या आतच भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा करावी लागली. पाकिस्तानचं लढाऊ विमान F16 पाडल्यानंतर अभिनंदन यांचं MIG21 हे लढाऊ विमानही कोसळलं.

यानंतर अभिनंदन यांचं पॅराशूट पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरलं, जिथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं. मात्र आम्हाला आमचा वैमानिक कोणत्याही अटीशिवाय सुरक्षित पाठवा, अशी भूमिका भारताने घेतली. भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावात काल (28 फेब्रुवारी) पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची घोषणा केली. आज वाघा बॉर्डरवरुन अभिनंदन भारतात परतणार आहेत.

पाकिस्तानने अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. अभिनंदन भारतात परत येण्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर, अभिनंदन यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य

शौर्याचं दुसरं नाव अभिनंदन
पाकिस्तानच्या ताब्यात असूनही अभिनंदन यांनी पाकला कोणतीही माहिती दिली नाही. एवढंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरल्यानंतर भारतीय वायूसेनेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे त्यांनी अक्षरशा: खाल्ली. विंग कमांडर अभिनंदन यांनी त्यांच्याकडील अनेक दस्तऐवज तलावात टाकले. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असूनही ते अतिशय निर्भीड होते. मी कोणतीही माहिती देणार नाही, असंही त्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं. पॅराशूटद्वारे अभिनंदन खाली उतरले तेव्हा लोकांनी त्यांना घेरलं आणि गैरवर्तन केलं. परंतु अभिनंदन यांनी धीर सोडला नाही.

विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानात कसे पोहोचले
पाकिस्तान वायूदलाच्या विमानांनी परवा भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय वायदलानेही याला सडेतोड उत्तर दिलं होतं. भारताने पाकिस्तानचं लढाऊ विमान F16 उद्ध्वस्त केलं. परंतु या कारवाईत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं MIG21 विमान कोसळलं. याच MIG 21 मधून पॅराशूटमधून उतरताना ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले, यानंतर पाकिस्तान सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं होतं.

संबंधित बातम्या

गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेला वैमानिक

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा

बालाकोटमधील एअर स्ट्राईकचे पुरावे आहेत, तिन्ही दलाची संयुक्त पत्रकार परिषद

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.