FANI CYCLONE LIVE UPDATE : 'फनी' चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलं, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

भारतीय किनारपट्टीकडे सरसावणारे फनी चक्रीवादळ आज सकाळी 10 ते दुपारी 12 च्या दरम्यान ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकेल,

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 May 2019 11:06 PM
फनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलं, 12 जिल्ह्यांना बसणार फटका, चक्रीवादळामुळे तिघांचा मृत्यू
कोलाकातामध्ये मुसळधार पावसाची हजेरी




फनी वादळ मध्यरात्री कोलकातामध्ये धडकणार, कोलकातापासून 200 किमी अंतरावर
फनी चक्रीवादळ ओदिशामधून पुढे सरकलं, संध्याकाळी बंगालला तडाखा बसण्याची शक्यता
फनी चक्रीवादळामुळे सोलापुरातून धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्या रोखल्या
आज रात्री 8.30 वाजता फनी वादळ बंगालमध्ये धडकणार
कोलकात्याला जाणारी सर्व विमाने रोखली
मागील 24 तासात ओदिशाच्या गोपालपूरमध्ये 169 मिमी तर पुरीमध्ये 106 मिमी पावसाची नोंद
#CycloneFaniUpdates : केंद्रीय गृह मंत्रालयाने ओदिशा आणि कोलकात्यामधील लोकांसाठी 1938 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.
फनी चक्रीवादळ ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकलं,
तासाभराने वादळाचा वेग कमी होण्याची शक्यता

5 ते 6 तास परिणाम राहण्याची शक्यता
फनी चक्रीवादळ ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकलं,
तासाभराने वादळाचा वेग कमी होण्याची शक्यता

5 ते 6 तास परिणाम राहण्याची शक्यता
फनी चक्रीवादळ 175 किमी वेगाने ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकलं,
5 ते 6 तास परिणाम राहण्याची शक्यता
11 लाख नागरिकांना सुरक्षिस्थळी हलवलं
175 किमी वेगाने फनी चक्रीवादळ ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकलं,
ओदिशातल्या 14 जिल्ह्यांवर चक्रीवादळाचा परिणाम,
पुरी आणि भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस
फनी वादळामुळे शेतीसह रस्त्यांचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ओदिशाच्या किनारपट्टी भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
फनी चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीपासून केवळ 60 किमी आंतरावर
पुरी, भुवनेश्वर आणि चिल्कामध्ये जोरदार पावसाला सुरुवात
फनी चक्रीवादळामुळे हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांना सतर्कतेचा इशारा जाहीर केला आहे. तसेच पर्यटकांना पुरी शहर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर एनडीआरएफ आणि नौदलाला सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
180 ते 200 किमी वेगाने फनी चक्रीवादळ ओदिशाच्या समुद्रकिनारी धडकणार,
सकाळी 11 नंर वादळाची गती कमी होण्याची शक्यता

पार्श्वभूमी

भारतीय किनारपट्टीकडे सरसावणारे फनी चक्रीवादळ आज सकाळी 10 ते दुपारी 12 च्या दरम्यान ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. फनी चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी युद्ध स्तरावर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

फनी चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची 81 पथके तैनात करण्यात आली आहेत. 223 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळावरुन हवाई वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिशा सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष ठेवून आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.