Ayodhya Hearing | अयोध्याप्रकरणी दोन्ही पक्षांचे युक्तीवाद पूर्ण, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला
सर्वोच्च न्यायालयाकडून आज दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांचा अवधी देण्यात येईल. तर युक्तिवादासाठी दोन्ही पक्षकारांना 45-45 मिनिटं देण्यात येणार आहेत.
मध्यस्थ समितीकडून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर, सुन्नी वक्फ बोर्डाची इतर ठिकाणी जाण्याची तयारी, वादग्रस्त जागेएवजी इतर ठिकाणी जाण्याची तयारी, सूत्रांची माहिती
पार्श्वभूमी
नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा बुधवार (16 ऑक्टोबर) शेवटचा दिवस असू शकतो, असे संकेत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा काल (15 ऑक्टोबर) 39 वा दिवस होता. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावा, असं सांगण्यात आलं आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी म्हटलं की, सर्व पक्षकार बुधवारी आपला युक्तीवाद पूर्ण करतील, अशी आशा आहे. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा होईल. मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा पूर्ण झाल्यास बुधवारीच निकाल सुरक्षित ठेवला जाईल. मात्र न्यायालय काय निश्चित करणार यावर सगळं अवलंबून आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून आज दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांचा अवधी देण्यात येईल. यामध्ये दोन्ही पक्षकारांना कोणत्या प्रकारचा दिलासा हवाय, हे विचारलं जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण होईल. हिंदू पक्षकारांना एक आणि मुस्लीम पक्षकारांना एक तास देण्यात येणार आहे. तर युक्तिवादासाठी दोन्ही पक्षकारांना 45-45 मिनिटं देण्यात येणार आहेत.
संवेदनशील खटला असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आलं आहे, तर 200 शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. शिवाय वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणाचा 17 नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. खटल्याची सुनावणी ज्या खंडपीठासमोर सुरु आहे, त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
संबंधित बातम्या
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -