Fact Check:
राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीच्या नामांकनासाठी गेल्या होत्या? नाही, २०२२ चा फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल
Claim
राष्ट्रपती मुर्मू या उमेदवारी दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत आल्या होत्या.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे छायाचित्र समोर आले आहे. चित्रात, पंतप्रधान मोदी टेबलावर बसलेल्या व्यक्तीला कागदपत्रांचे बंडल देताना दिसत आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींसोबत गेल्या होत्या असा दावा करीत हा फोटो शेयर केला आहे. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.
अनेक फेसबुक युजर्सनी कॅप्शनसह प्रतिमा शेअर केली, “श्री नरेंद्र मोदी, भारताचे राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती हे निवडणूक आचारसंहितेचे घोर उल्लंघन आहे. त्यांनीही आपल्या पदाची बदनामी केली आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली पाहिजे.” इतरांनी असाच दावा करणाऱ्या X पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला.
अशा पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
“नरेंद्र मोदी,” “नामांकन” आणि “लोकसभा निवडणुका” या कीवर्डच्या शोधामुळे पंतप्रधानांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत उमेदवारी दाखल केली आहे असे सूचित करणारे कोणतेही विश्वसनीय रिपोर्ट मिळाले नाहीत.
तथापि, अनेक रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी २४ जून रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकनावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) इतर ज्येष्ठ सदस्यही उपस्थित होते.”
Conclusion
अशाप्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना काढलेली जुनी प्रतिमा भारताच्या राष्ट्रपती पंतप्रधान मोदींसोबत त्यांच्या निवडणुकीच्या नामांकनाच्या वेळी आल्या हे दिशाभूल करीत दर्शविण्यासाठी वापरण्यात आली आहे.
Result: False
Disclaimer: This story was originally published by Newschecker and republished by ABP Live Marathi as part of the Shakti Collective.