नवी दिल्ली (साजन कुमार/प्रत्यूष रंजन पीटीआई फॅक्ट चेक) : सोशल मीडियावर भारताचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याचे कथित फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो रुग्णालयात बेडवर झोपलेल्या स्थितीत पाहायला मिळतो. या फोटोंसह जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करणारा आहे.
पीटीआय फॅक्ट चेक डेस्कच्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा ठरला. या पडताळणीत हे फोटो एआय जनरेटेड असून बुमराह रुग्णालयात दाखल झाल्याचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दावा :
फेसबुक पेज ‘क्रिकेट दुनिया’ ने 7 फेब्रुवारीला जसप्रीत बुमराहचा कथित फोटो शेअर करुन "जसप्रीत बुमराहची बिघडलेली तब्येत, एक सच्चा देशभक्त होऊन तुम्ही एक लाईक देऊन आशीर्वाद आणि प्रेम द्या, तो भारताची शान आहे, आपली जान असून महान आहे." पोस्टची लिंक, अर्काईव्ह लिंक आणि स्क्रीन शॉट इथं पाहा.
फेसबुक यूजर मोहम्मद कासिम ने लिहिलं, “जसप्रीत बुमराहची तब्येत खूप खराब आहे... ” पोस्टची लिंक, आर्काइव लिंक आणि स्क्रीनशॉट इथ पाहा.
पडताळणी:
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, डेस्कने व्हायरल फोटोची गुगल लेन्सच्या मदतीनं रिव्हर्स इमजे सर्चद्वारे पडताळणी केली. यामध्ये आम्हाला काही सोशल मिडिया पोस्ट आढळल्या, ज्यामध्ये हा फोटो एआय जनरेटेड असल्याचं सांगण्यात आलं. पोस्टची लिंक इथं, इथं आणि इथ पाहा.
या आधारे पडताळणी पुढं सुरु ठेवत डेस्कनं फोटोंची एआय डिटेक्टर टूल, हाईव्ह मॉडरेशन आणि साइट इंजिन स्कॅन केलं. यामध्ये फोटो 99 टक्के एआय जनेरेटेड असल्याचं सांगण्यात आलं, स्क्रीन शॉट इथं पाहा.
पडताळणी दरम्यान जसप्रीत बुमराहचा अलीकडील फोटो डेस्कला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेल्यानंतरचा तो बुमराहचा पहिला फोटो आहे. ज्यात बुमराह सेल्फी काढत असून तो फिट आहे.
बुमराहनं 13 फेब्रुवारी 2025 ला इन्स्टाग्रामव एक फोटो शेअर केला आहे. यावर त्यानं रीबिल्डिंग कॅप्शन लिहिलं आहे. मात्र, यामुळं बुमराह रुग्णालयात दाखल झाला नसल्याचं दिसून आलं. पोस्टचा सक्रीन शॉट इथं पाहा.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एआय जनरेटेड आहे. बुमराह रुग्णालयात दाखल असल्याचा दावा चुकीचा आहे.
दावा
“जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली”
तथ्य
पीटीआई फॅक्ट चेक डेस्कच्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा असल्याचं सिध्द झालं.
निष्कर्ष
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो फेक असून दावा चुकीचा आहे. जसप्रीत बुमराह रुग्णालयात भर्ती झालेला नाही.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा पीटीआयवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]