नवी दिल्ली (विश्वास न्यूज) : रेल्वेमध्ये वेटिंग तिकिटाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारतीय रेल्वेच्या वेटिंगच्या नियमात बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. वेटिंग तिकिटावरील प्रवासी ट्रेनमधून प्रवास करु शकतात असा दावा करण्यात आला. याशिवाय भारतीय रेल्वे 1 जानेवारी 2025 पासून रेल्वे वेटिंग तिकीटाबाबत नवा नियम लागू करणार असल्याचा दावा करण्यात येत होता.  


विश्वास न्यूजच्या पडताळणीत असं सत्य समोर आलं की वेटिंग तिकीटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास दंड भरावा लागू शकतं. ऑनलाईन बुक केलेलं तिकीट कन्फर्म न झाल्यास रद्द होतं, खात्यात पैसे जमा केले जातात. 1 जानेवारीपासून नवा नियम लागू होण्यासंदर्भातील कोणतंही नोटिफिकेशन किंवा रिपोर्ट मिळालेला नाही.  


व्हायरल पोस्टमध्ये काय? 


विश्‍वास न्‍यूजला 9599299372 क्रमांकावर एका यूजरनं एक पोस्ट पाठवून  याचं सत्य जाणून घ्यावं, असं सांगितलं. रेल्वेमध्ये वेटिंग तिकिटावर प्रवास करण्याबाबत नवा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार, त्यामुळं प्रवासी वेटिंग तिकीटावर कोणत्याही अडचणीशिवाय रेल्वेतून प्रवास करु शकणार,असा दावा करण्यात आला होता.  




फेसबुक यूजर News Beacon ने देखील अशाच प्रकारच्या दाव्याची पोस्ट लिहिली होती.(अर्काइव्ह लिंक)  


“Waiting Ticket New Rule: आता अडचणीशिवाय प्रवास करता येणार, जाणून घ्या रेल्वेचा नियम, भारतीय रेल्वे वेटिंग तिकीट धारकांसाठी नवी अपडेट जारी केली आहे, त्या नियमानुसार वेटिंग तिकीट असणारे प्रवासी कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करु शकणार, असा दावा करण्यात आला आहे. 





पडताळणी


व्हायरल दाव्याची तपासणी करण्यासाठी गुगलवर कीवर्डद्वारे सर्च करण्यात आलं. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार चार्ट तार झाल्यानंतर ज्या प्रवाशांची नावं कन्फर्म आणि आरएसी असतील त्यांची नावं त्या चार्टमध्ये असतील, तेच प्रवास करु शकतात. ज्यांचं नाव कन्फर्म किंवा आरएसीमध्ये नसेल त्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये असतात. ज्यांची नावं कन्फर्म प्रवाशांच्या यादीत किंवा आरएसीमध्ये नसतील त्यांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची परवानगी नाही. प्रवास करताना पाहायला मिळाले तर त्यांना रेल्वेच्या नियमांनुसार विना तिकीट प्रवासी म्हणून दंड द्यावा लागेल. तर, वेटिंग तिकीट रद्द झाल्यानंतर आयआरसीटीसीच्या नियमानुसार रिफंड  दिला जातो.  




आरसीटीसीच्या कॅन्सलेशन नियमानुसार पहिल्या चार्टिंगनंतर एखाद्या प्रवाशाचं तिकीट कन्फर्म न होता वेटिंगवर राहिल्यास ते रद्द होईल. त्या तिकिटाची रक्कम खात्यात वर्ग केली जाईल. 




पीआईबीच्या फॅक्ट चेक यूनिटच्या  18 जुलै 2024 च्या पोस्टम्ये माहिती देण्यात आली होती की 2010 च्या परिपत्रकानुसार आरक्षित डब्यात केवळ कन्फर्म आणि आरएसी तिकीट असणारे प्रवेश करु शकतात. वेटिंग तिकीट आपोआप रद्द होतं.  जर एखाद्या प्रवाशानं तिकीट खिडकीवरुन वेटिंग तिकीट खरेदी केलं असेल तर तो जनरल डब्यातून प्रवास करु शकतो, मात्र त्याला आरक्षित डब्यातून प्रवास करता येत नाही, या नियमात बदल करण्यात आलेला नाही.  


इंडिया डॉट कॉमच्या वेबसाइटवरील 16 जुलै 2024 च्या बातमीनुसार भारतीय रेल्वेनं वेटिंग तिकिटावरील प्रवाशांसाठी कठोर नियम लागू केले आहेत. त्यानुसार वेटिंग तिकीटावर आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नाही. असे प्रवासी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करुन त्यांना पुढील स्टेशनवर त्या डब्यातून उतरवलं जाईल. वेटिंग तिकीटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास प्रवाशाला एसी डब्यातून प्रवास केल्यास  किमान 440 रुपये दंड भरावा लागेल. याशिवाय पुढील स्टेशनपर्यंतचं तिकीट काढावा लागेल. तर, स्लीपर डब्यातून प्रवास केल्यास 250 रुपये द्यावे लागतील.   






29 नोव्हेंबर 2024 ला राज्यसभेत वेटिंग तिकिटाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं की, वेटिंग लिस्टमध्ये नाव असणारे प्रवासे आरक्षित डब्यातून प्रवास करु शकत नाहीत.  





पडताळणीत रेल्वेच्या वेटिंग तिकीटासंदर्भातील नियमातील बदलाबाबत नोटिफिकेशन मिळालं नाही किंवा 1 जानेवारी 2025 पासून कोणता नियम लागू होतोय, ते देखील मिळालं नाही.  


नॉर्थ-वेस्टर्न रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी कमल जोशी यांनी म्हटलं की वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवास करता येत नाही. त्या तिकीटासह प्रवास केल्यास दंड भरावा लागेल. 1 जानेवारी 2025 पासून नियम बदलाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, असं सांगण्यात आलं.  


वेटिंग तिकिटाबाबत खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर्सचे फेसबुकवर केवळ  16 फॉलोअर्स आहेत.  


[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूज वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]