विश्वास न्यूज (नवी दिल्ली): भजन गायक अनुप जलोटा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी हिरवा कुर्ता आणि इस्लामिक टोपी घातलेली दिसून येते. आता काही यूजर्स, हा फोटो शेअर करत असा दावा करत आहेत की, अनुप जलोटा यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. खरेतर, अनुप जलोटा यांचा व्हायरल केला जात असलेला फोटो, त्यांच्या “भारत देश है मेरा” या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा आहे. जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल
फेसबुक वापरकर्ता Kanhaiya Dixit ने 19 मार्च 2025 रोजी पोस्ट करत लिहिले की, “हे प्रसिद्ध भजन गायक, अनुप जलोटा आहेत ज्यांचे भजन जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आणि मंदिरात ऐकले जाते.
काही दिवसांपूर्वी, त्यांनी, त्यांच्यापेक 50 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी प्रेम प्रसंग केला होता. आपण जास्त तपशीलात जाणार नाही. पण तेव्हा त्याचे चारित्र्य समोर आले होते, पण आता त्यांनी आणखी पुढे मजल मारली आहे.
आपाला धर्मच बदलला, आता नाव देखील बदला”
फेसबुक पोस्टमधील मजकूर येथे जसाच्या तसा लिहिला आहे. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येईल.
पडताळणी
व्हायरल दाव्याची चौकशी सुरू करताना, आम्ही गुगल ओपन सर्चचा वापर केला. आम्ही अनुप जलोटा यांच्याशी संबंधित बातम्या, संबंधित कीवर्ड टाइप करून शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे, याची पुष्टी करणारी कोणतीही बातमी आम्हाला सापडली नाही.
परंतु शोधाच्या दरम्यान, आम्हाला अशा अनेक बातम्या सापडल्या, ज्यात लिहिले गेले की, हा त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधील एक फोटो आहे. आम्हाला ndtv.in या वेबसाइटवर एक बातमी सापडली. 20 मार्च 2025 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत असे लिहिण्यात आले होते की, भजन गायक, अनुप जलोटा यांनी आपला धर्म बदलला नाही परंतु हा त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमधील फोटो आहे. अनुप जलोटा यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये ते दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. हे फोटो त्यावेळचे आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.
व्हायरल फोटोशी संबंधित बातम्या, इतर अनेक न्यूज वेबसाइटवर देखील आढळल्या.
तपास पुढे नेत, आम्ही अनुप जलोटा यांचे सोशल मीडिया हँडल तपासले. आम्हाला अनुप जलोटा यांच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हायरल झालेले फोटो सापडले. 18 मार्च 2025 रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “नाशिक या चैतन्यशील शहरात, “भारत देश है मेरा’ या चित्रपटाची शूटींग करण्यास उत्सुक आहे! #BhaaratDeshHaiMera #ShootingInNasik #FilmProduction #Bollywood #OnSet #BehindTheScenes #IndianCinema #Nasik”
आम्हाला येथे इतरही काही फोटो सापडले, जे “भारत देश है मेरा” चित्रपटाच्या शुटिंगमधील असल्याचे सांगितले जाते.
व्हायरल पोस्टच्या पुष्टीसाठी, दैनिक जागरणच्या वरिष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव, ज्या मुंबईत बॉलीवूड कव्हर करतात, यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी आम्हाला पुष्टी केली की, व्हायरल दावा खोटा आहे. हा फोटो अनुप जलोटा यांच्या चित्रपटाच्या शुटिंगमधील आहे.
शेवटी, आम्ही पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. फेसबुकवर या वापरकर्त्याला 18 हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात, अनुप जलोटा यांच्या फोटोबद्दल केला जात असलेला दावा खोटा असल्याचे आढळून आले. त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही. हा फोटो त्याच्या आगामी “भारत देश है मेरा” चित्रपटाच्या शूटिंगचा आहे, जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
Claim Review : अनुप जलोटा यांनी त्यांचा धर्म बदलला आहे.Claimed By : फेसबुक वापरकर्ता - Kanhaiya DixitFact Check : False
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]