Fact Check :
निर्णय : फेक
एलन मस्क आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीचा व्हायरल फोटो एआयद्वारे तयार करण्यात आलेला आहे. पडताळणीत यासंदर्भातील सत्य समोर आलं आहे.
दावा नेमका काय?
आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मूख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांच्यासोबत उभे असल्याचं दिसून येतं. त्यामध्ये एलन मस्क यांच्या हातात पुष्पगुच्छ दिसून येतो. या फोटोसह हा दावा केला जातोय की एलन मस्क हे अरविंद केजरीवाल भेटण्यासाठी भारतात आले आहेत.
एका फेसबुक यूजरन्ं त्या फोटोसोबत कॅप्शन शेअर करत म्हटलं की ब्रेकिंग- एलन मस्क सकाळी सकाळी @ArvindKejriwal यांना भेटण्यासाठी भारतात आला. दिल्लीतील शिक्षा आणि आरोग्य सेवा सुधारणावर चर्चा केली जात आहे. हे धोरण अमेरिकेत लागू करण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्याची योजना आहे. केजरीवाल यांनी स्वत: विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अशा दाव्यांबाबतच्या इतर पोस्टच्या अर्काईव्ह लिंक इथं आणि इथं पाहा.
फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हा फोटो शेअर केला जात आहे. अरविंद केजरवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. मात्र, आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन बनवण्यात आला आहे.
सत्य काय?
व्हायरल फोटो काळजीपूर्वक पाहिलं असता 'राइजिंगपिकू'लेबल असलेला वॉटरमार्क पाहायला मिळतो. एक्सवर सर्च केलं असता त्या नावाचं खातं पाहायला मिळालं. 13 डिसेंबर 2024 ला त्या खात्यार हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. (आर्काइव्ह इथं) पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजरनं स्पष्ट केलंय की हा फोटो एआयद्वारे बनवण्यात आला आहे. (आर्काइव्ह इथं आणि इथं पाहा) अकाऊंटच्या बायोत पाहता येईल की "एआय एन्थुसियस्ट", "पॉलिटिकल कॅम्पेनमध्ये एआयचा वापर करणारा पहिला व्यक्ती" आणि "एआय जनरेटेड इमेज पोस्ट करा"
फोटोत पाहाता येईल की एआय द्वारे फोटो तयार केलं असल्याचं स्पष्टपण पाहता येतं. मस्क यांचा हात कृत्रिम असल्याचं दिसतं. मागं असलेले लोक देखील ओळखू येत नाहीत. हेच एआय जनरेटेड फोटोचं वैशिष्ट्य आहे, एआय जनरेटेड फोटोंची तपासणी करण्यासाठी लॉजिकली फॅक्टसच्या वेबसाईटला भेट द्या.
या फोटोची एआय डिटेक्शन टूल द्वारे तपासणी केली. हाई मॉडरेशननं या फोटोला 97.4 टक्के शक्यतेसह एआय जनरेटेड असल्याचं म्हटलं. ट्रू मिडियानं हा फोटो 96-97 टक्के एआय जनरेटेड असल्याची शक्यता व्यक्त केली.
केजरीवाल आणि मस्क यांच्या एक्स अकाऊंटची तपासणी केली असता भारतात अशा प्रकारची बैठक झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. आम आदमी पार्टीच्या कोणत्याही मीडिया रिपोर्टमध्ये मस्क केजरीवालांना भेटण्यासाठी भारतात आल्याचं दिसून येत नाही.
निर्णय :
सोशल मीडिया यूजर्सकडून केला जाणारा दावा चुकीचा आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आण एलन मस्क यांचा फोटो एआय जनरेटेड असल्याचं स्पष्ट झालं आहे.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा लॉजिकली फॅक्टस वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]