Claim : भाजपच्या प्रचाराच्या बॉक्समध्ये सोन्यची बिस्किटे आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल


Fact Check : व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवलेला पांढर बॉक्स सोन्यांच्या बिस्किटांचा नसून परफ्युम आहे.


 


काही दिवसांपूर्वी निवडणूक पथकाने भाजपा उमेदवाराच्या प्रचाराच्या साहित्याचे बॉक्स जप्त केले होते. या बॉक्सची तपासणी सुरू असताना व्हिडिओमध्ये ‘हे सोन्याची बिस्किटे आहेत. तपासा!’ असे ऐकू येते. 


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मतदारांना सोन्याच्या बिस्किटांचे भाजप आमिश दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सुरू आहे.


फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.


पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेला पांढरा बॉक्स सोन्याच्या बिस्किटांचा नसून परफ्यूम आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.


काय आहे दावा ?


व्हायरल व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचारी बॉक्सची तपासणी करत त्यामधील सर्व साहित्य बाहेर काढतात. कर्मचारी छोट्या पांढऱ्या बॉक्सकडे पाहून हे काय आहे असे विचारल्यावर आवाज येतो की, ‘हे सोन्याची बिस्किटे आहेत. तपासा!’


युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हा काय प्रकार चालू आहे ?”



मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह


तथ्य पडताळणी


कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये सोन्याचे बिस्किटे नव्हती.


एनडीटीव्हीच्या बातमीनुसार व्हायरल व्हिडिओमधील प्रचाराचे साहित्य उत्तर मध्य मुंबईचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांचे होते.


एनडीटीव्हीचे पत्रकार सुनिल सिंग यांनी अजय बडगुजरांना व्हायरल व्हिडिओ संबंधित होणाऱ्या चर्चेवर सवाल केल्यावर त्यांनी सांगितले की, “ज्या सोन्याच्या बिस्किटाबद्दल सर्व बोलत आहेत. हे बिस्किट सोन्याचे नसून प्लास्टिकचे आहे. मुळात ही बिस्किटे नसून परफ्युमची बाटल्या आहे.”



खालील मुलाखतमध्ये बडगुजर सांगतात की, “मी माझ्या कुटुंबासोबत आईस्क्रीम खायला गाडीतून  बाहेर पडलो होतो. परत येत असताना पथकाने गाडी अडवली, त्यांना प्रचाराच्या साहित्याचे बॉक्स दिसले आणि आम्हाला पोलीस ठाण्यात आणले. आम्हाला तेथे तासनतास वाटपाहावी लागली होती. कर्मचाऱ्यांनी बॉक्सची तपासणी करत असताना त्यांनी मला परफ्युमची बाटल दाखवत त्या बाबत विचारले तर मी त्यांना सांगितले की, “ही सोन्याची बिस्किटे आहेत. तपासा!” परंतु, या किटमध्ये पोस्टर, बॅनर, टोपी आणि प्लॅस्टिक परफ्यूमची बॉटली आहे.”



मुंबईप्रेसच्या बातमीनुसार तपासणीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी ‘सोन्याची बिस्किटे आहेत का ते तपासा !’ असे म्हणाले त्यामुळे ही चर्चा सुरू झाली. मात्र तपासणीत केवळ प्रचाराचे साहित्य मिळाले, असे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.


निष्कर्ष


यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेला पांढरा बॉक्स सोन्यांच्या बिस्किटांचा नसून परफ्यूम बॉटल आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


Title:भाजपाच्या प्रचार बॉक्समध्ये खरंच सोन्याची बिस्किटे सापडली होती का ? वाचा सत्य



Result: False


[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा Fact Crescendo  वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]