Zomato apologises for Mahakal thali ad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) नव्या जाहिरातीवरून वाद वाढत आहे. दरम्यान, वाढती समस्या पाहता ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) माफी मागितली आहे. झोमॅटोच्या हृतिकच्या जाहिरातीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे. हृतिक रोशनच्या या झोमॅटो जाहिरातीमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावरून संपूर्ण वादाला तोंड फुटले आहे.


Zomato ने काय सांगितले?


माफी मागून झोमॅटो कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, जाहिरातीमध्ये बोललेल्या महाकाल की थाली या शब्दाचा अर्थ 'महाकाल रेस्टॉरंट'चा होता, महाकालेश्वर मंदिराचा नव्हता. वास्तविक, झोमॅटोच्या या नव्या जाहिरातीत हृतिकने म्हटले आहे की, "मला भूक लागली होती म्हणून महाकालकडून थाळी मागवत आहे." या जाहिरातीत महाकालेश्वर मंदिराच्या नावाने हृतिक रोशनच्या जाहिरातीवरून गदारोळ झाला होता. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


या जाहिरातीच्या व्हिडीओमध्ये हृतिक रोशनने अनेक शहरांची नावे दिली आहेत. त्यात उज्जैनच्या नावाचाही समावेश आहे. या दरम्यान हृतिक रोशन झोमॅटोच्या फूट डिलिव्हरी बॉयकडून पॅकेट घेतल्यानंतर एक ओळ बोलताना दिसत आहे आणि ती ओळ आहे - "थाली का मन किया, उज्जैन में, फिर महाकाल से मंगवा लिया". त्याचवेळी हृतिकच्या या जाहिरातीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाकाल मंदिराचे पुजारी या जाहिरातीला विरोध करत आहेत.


या जाहिरातीवर पुरोहितांनी तीव्र आक्षेप नोंदवला


एवढेच नाही तर, पुजाऱ्यांनी या जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेतला असून महाकाल मंदिरातून अशी कोणतीही थाळी उज्जैनमध्येही संपूर्ण देशात पोहोचवली जात नसून केवळ मंदिरासमोरील भाविकांना ती मोफत दिली जाते, असा आरोप केला आहे. 


खरंतर हे संपूर्ण प्रकरण उज्जैनमधील त्या सर्व ढाबा रेस्टॉरंटशी संबंधित आहे, ज्यांचे नाव महाकालच्या नावावर आहे. महाकाल असे नाव असलेल्या सर्व ढाबे आणि रेस्टॉरंट्समधून डिजीटल अॅपद्वारे खाद्यपदार्थ वितरणाचा प्रचार करून कंपनी लोकांना आकर्षित करू इच्छित आहे. 


महत्वाच्या बातम्या :