Zeenat Aman : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान (Zeenat Aman) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्मामुळे देखील चर्चेत असतात. अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत जीनत अमान यांनी काम केले आहे. 1970 मध्ये फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया पॅसिफिक इंटरनेशनल या स्पर्धेमध्ये  जीनत अमान यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या हलचल या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटामुळे जीनत अमान यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात देव आनंद यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 


जीनत आमान यांना वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच कठिण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. रिपोर्टनुसार, जीनत अमान यांनी अभिनेता संजय खानसोबत लग्न केले होते. पण संजय खान हे सार्वजनिक ठिकाणी जीनत अमान यांच्याबद्दल बोलणे टाळत होते. रिपोर्टनुसार, एका पार्टीमध्ये संजय आणि जीनत अमान यांच्यामध्ये भांडण झालं. त्यानंतर संजय खान यांनी जीनत अमान यांना मारलं. त्यानंतर जीनत अमान यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर जीनत अमान आणि संजय खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 


संजय खान यांच्यासोबत विभक्त झाल्यानंतर मजहर खान या चित्रपट निर्मात्यासोबत जीनत अमान यांनी लग्नगाठ बांधली. त्या दोघांना दोन मुलं आहेत. पण मजहर खान आणि जीनत अमान हे देखील विभक्त झाले. जीनत अमान यांनी  धरमवीर, यादों की बारात, सत्यम शिवम सुन्दरम आणि डॉन या हिट चित्रपटांमध्ये काम केले. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha