Zee Marathi New Serial: झी मराठी (Zee marathi News) वाहिनीवरची गाजलेली मालिका 'पारू' कथानकाच्या मध्यावरच अचानक बंद झाली. प्रेक्षकांना काही कळण्याच्या आतच 'पारू' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकेला अभिनेता प्रसाद जवादेची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 'दीपज्योती'.  ही गोष्ट आहे, प्रेमानं आपुलकीनं बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी की,  ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरं करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजेच, अभिजीतवर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसे हातात खेळत नसला तरी सद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.  तर दुसरीकडे आहे, एक घरंदाज कुटुंब ज्याचे प्रमुख आहेत, पुरुषोत्तम त्यांची तीन मुलं   स्वराज , दीप ,  विराज  आणि सोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचाय. विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीपचा त्याच्या वडिलांवर जास्त राग आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्यानं आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपचं जबाबदार आहे, अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला. 

गोष्ट सुरु होते, तीच एका धक्कादायक घटनेनं. एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण लागतं. तर  कसे दीप आणि ज्योती भेटणार त्यांचा  प्रवास कसा सुरू होणार हे बघणं मनोरंजक असणार आहे.   मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे ह्यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचं लेखन केलय अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी ह्यांनी तर संवाद लेखन केलय इरफान मुजावर यांनी, मालिकेचं दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केलं आहे. मालिका 13 एप्रिलपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Arjun Reddy Actor Rahul Ramakrishna Brother Dies: किटकनाशकामुळे प्रसिद्ध अभिनेत्यानं भाऊ गमावला; संतापून थेट मोदींना ट्वीट करत म्हणाला...