Zee Marathi Laxmi Niwas Serial 100 Episods Celebration: 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' (Laxmi Niwas) मालिकेनं नुकताच 100 भागांचा टप्पा गाठला आहे. अल्पावधीतच हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar), तुषार दळवी (Tushar Dalvi) स्टारर या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील शंभर भागांच्या सेलिब्रेशनचा आनंद खऱ्या अर्थानं तेव्हा द्विगुणित झाला, ज्यावेळी मुंबईचे रिक्षाचालक (Mumbai Rickshaw Driver) या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले.
'लक्ष्मी निवास' मालिकेनं आज 100 भागांचा हृदयस्पर्शी टप्पा गाठला. पण हा आनंद द्विगुणित तेव्हा झाला, जेव्हा मुंबईचे रिक्षाचालक या उत्सवात सहभागी झाले. 'लक्ष्मी निवास' टीमनं एका खास सेलिब्रेशनसाठी रिक्षाचालकांना आपल्या सेटवर आमंत्रित केलं. सध्याची कथा, जिथे श्रीनिवास, एका रिक्षाचालकाची भूमिका साकारत आहे, त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. हे सर्व कष्ट सुरू आहेत, एक हक्काच्या घरासाठी. या वेळेस मालिकेतील सर्व कलाकार सामील झाले आहेत. रिक्षाचालकांनी, लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव ऐकून लक्ष्मीचे डोळेही पाणावले. त्यांच्या मेहनतीचे किस्से ऐकल्यावर त्यांना आपल्या गोड आणि साहसी शब्दांनी प्रोत्साहन दिलं. लक्ष्मी म्हणजेच, हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं की, मी अनेकदा मुंबईच्या रिक्षामध्ये प्रवास केला, भलेही रात्रीचे 2 किंवा 3 वाजले असतील, पण मला नेहमीच सुरक्षितपणे घरी पोहचवलं आहे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. अशा अनेक गप्पा सुरू असतानाच लक्ष्मी निवासचं संपूर्ण कुटुंब सेटवर पोहचलं आणि यशस्वी 100 भाग पूर्ण झाले, याच सेलिब्रेशन म्हणून रिक्षाचालक भावांसोबत केक कापला.
दरम्यान, रिक्षाचालक बंधू वेळात वेळ काढून 'लक्ष्मी निवास' सेटवर आले आणि श्रीनिवास, लक्ष्मी सोबत गप्पा मारल्या आणि 100 भागांच्या सेलेब्रेशनमध्ये सहभागी झाले, म्हणून झी मराठी आणि लक्ष्मी निवास कुटुंबाकडून त्यांना एक आंब्यांची पेटी भेट म्हणून देण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :