Bill Gates Net Worth: दीर्घकाळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासंदर्भात एक अपडेट समोर आली आहे. बिल गेट्स यांनी त्यांची 99 टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय जाहीर करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.  गेट्स त्यांच्या संपत्तीपैकी 99 टक्के  संपत्ती दान करतील तर एक टक्के रक्कम त्यांच्या मुलांसाठी ठेवणार असल्याचं म्हटलं. बिल गेटस अब्जाधीश आहेत, त्यांनी 1 टक्के संपत्ती मुलांसाठी सोडली तरी त्यांची मुलं देखील अब्जाधीश होतील.  

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी 2021 मध्ये  27 वर्षांचा संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला होता. दोघे त्यावेळी वेगळे झाले होते. दोघांना तीन मुलं आहेत. यामध्ये मुलगी जेनिफर कॅथरीन गेट्स (28), रोरी जॉन गेट्स (27) आणि फोबी एडेल गेट्स (22) अशी त्यांची वयं आणि नावं आहेत. बिल गेट्स यांच्या मते त्यांच्या मुलांननी स्वत: ची ओळख निर्माण करावी.त्यांनी माझ्या वारशात दबून राहू नये. यासाठी 99 टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, केवळ 1 टक्के हिस्सा त्यांच्या मुलांसाठी राहील.  

बिल गेट्स यांच्याकडे संपत्ती किती?

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे दीर्घकाळ जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती 162 अब्ज अमेरिेकनं डॉलर्स आहे. म्हणजेच भारतात13900 अब्ज रुपये इतके होतात. गेट्स यांनीया पूर्वीच मानवी कल्याणासाठी त्यांच्या फाऊंडेशनद्वारे  संपत्तीचा खर्च करण्याची घोषणा केली आहे.  बिल गेट्स यांची संपत्ती 13900 कोटी रुपये आहे. बिल गेट्स फाऊंडेशनद्वारे ते विविध ठिकाणी मानवी कल्याणासाठी वापरला जातात.  

 बिल गेट्स यांच्याकडून सातत्यानं समाज कार्य सुरु असतं. आम्ही संपत्तीचा 99 टक्के भाग दान केल्यास त्यांना 1 टक्के फायदा मुलांना मिळेल.  

इतर बातम्या : 

American Share Market : टॅरिफला स्थगिती दिली, चीनवर 145 टक्के टॅरिफ लागणार, इतकं करुनही अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला...

PM Kisan : पीएम किसानच्या 20 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार, अन्यथा 2000 रुपये...