Zee Marathi Aapli Dupaar Timing And Shows List: प्रेक्षकांची लाडकी झी मराठी वाहिनी नेहमीच आपल्या ऑडियन्सच्या मनोरंजनाचा विचार करते. मालिका असो किंवा शो, झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायम नवनवीन प्रयोग सादर करताना दिसते. दरम्यान, प्रेक्षकांच एक्सट्रा मनोरंजन व्हावं यासाठी झी मराठी लवकरच नवा प्रयोग सादर करणार आहे. ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ याद्वारे प्रेक्षकांचं डबल एन्टरटेनमेंट होणार आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाला प्रतिसाद देत झी मराठी नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न करत असते. प्रेक्षकांच्या मनातील जिव्हाळा जपण्यासाठी झी मराठी वाहिनी सातत्याने पुढाकार घेत असते. ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ यामुळे प्रेक्षकांचं एक्स्ट्रा मनोरंजन होणार, यात शंका नाही.
‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ (Zee Marathi Brings Extra Entertainment)
‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ हे नेमकं आहे तरी काय? जाणून घेऊयात. 13 एप्रिलपासून दररोज दुपारी 1 ते 3 या वेळेत घरातील जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी हा वेळ खास ठरणार आहे. दिवसातील थोडा वेळ स्वतःसाठी राखून आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे. या विशेष सत्रात 'सावळ्याची जणू सावली', 'लक्ष्मी निवास', आणि 'आम्ही सारे खवय्ये' या लोकप्रिय कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘एक्स्ट्रा इनिंग्स’मुळे मालिकांचा घ्या एक्स्ट्रा आनंद
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रे याची दमदार एंट्री होणार आहे. या नव्या वळणामुळे मालिकेची कथा अधिक उत्कंठावर्धक ठरणार असून पुढे कथानक कोणते नवे वळण घेणार याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. यासोबतच ‘मनोरंजनाचा Powerplay’, च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांना आणखी रोमांचक बनवणार आहे. या मनोरंजनाच्या Powerplay मध्ये ' शुभ श्रावणी' , 'वीण दोघातली ही तुटेना', 'तारिणी' आणि 'देवमाणूस- मधला अध्याय' या मालिका आता 30 मिनिटांऐवजी 45 मिनिटांच्या असणार आहेत . या ‘एक्स्ट्रा इनिंग्स’मुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचा एक्स्ट्रा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे आनंद, उत्कंठा आणि भावनांनी परिपूर्ण अशा मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी 13 एप्रिलपासून, ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ बघायला विसरू नका. यासंदर्भातील झी मराठीने खास आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
