शिरुर, पुणे : शिरुर लोकसभेच्या उमेदवाराचा तिढा सुटत  (Shirur Loksabha)नाही आहे. आता महायुतीतच (Mahayuti) रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच युतीत उमेदवारांची आयातदेखील केल्याचं यापूर्वीच्या निवडणुकीत घडलं आहे. असं असताना शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयात उमेदवार नको, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस  (NCP)पक्षाचा बैठकीत कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे आता शिरुरमध्ये नेमकं काय घडतं? उमेदवारी कोणाला जाहीर होईल?,  हे पाहणं रंजक असणार आहे. 


मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणुन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा  सुरु होती. त्यांनीदेखील वरिष्ठांचा आदेश आला तर लढण्याची तयारी दाखवली होती. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील घेतली होती. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र आयात उमेदवाराला साफ नापसंती दर्शवली आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा नावासाठी पक्षाकडे मागणी केली जात आहे. 


शिरुर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आणि त्याच दिवसापासून या मतदार संघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या. महायुतीत याच मतदार संघासाठीट रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.


आढळराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढायला तयार?



रस्सीखेच सुरु असली तरीही आढळराव पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय बैठकीत  घेतला होता आणि कार्यकर्त्यांची हीच इच्छा असल्याचंही ते म्हणाले होते. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीसंदर्भात त्यांनी सांगितलं होतं की अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यामुळं त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले होते. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं? अशी चर्चा बैठकीत झाली असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत सगळ्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयार दाखवली होती. मात्र आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. त्यामुळे पुढे काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Maval Loksabha Shrirang Barne : कमळावर लढणार की धनुष्यबाणावर, श्रीरंग बारणेंनी ठामपणे सांगून टाकलं; म्हणाले...