Zee Chitra Gauarav 2025: झी मराठीचा (Zee Marathi) 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' (Zee Chitra Gauarav Award 2025) येत्या 8 मार्चला प्रसारित केला जाणार आहे. या भव्य सोहळ्याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहेत. झी मराठीच्या झी गौरव पुरस्कारांचं यंदाचं 25वं वर्ष आहे. मनोरंजनाचा हा सोहळा खूप जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. त्यासोबतच नव्या आठवणींचा साठाही होणार आहे. या भव्य सोहळ्याला झी मराठीवरील मालिकांमधील जवळपास सर्वच कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यात सर्वांची लाडकी 'पारू' (Paaru Marathi Serial) देखील उपस्थित होती. 'पारू'नं हटके परफॉर्मन्सही दिला. या परफॉर्मन्स बद्दल बोलताना पारू म्हणजेच, शरयू सोनवणेनं (Sharayu Sonawane) स्टेजवरचे काही किस्सेही उलगडले.
खरं तर 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' सोहळ्याच्या मंचावरचा परफॉर्मन्स 'पारू' म्हणजेच, शरयू सोनवणेसाठी मौल्यवान ठरला. कारण, तिनं सोहळ्याच्या मंचावर अभिनेता श्रेयस तळपदेसोबत परफॉर्मन्स दिला. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, "झी चित्र गौरव पुरस्काराचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. हे वर्ष झी चित्र गौरव पुरस्कारचे 25 वर्ष आहे आणि मला परफॉर्म करण्याची संधी मिळणं, हा खूप मौल्यवान क्षण आहे. माझा पहिला परफॉर्मन्स आणि तो ही श्रेयस तळपदे सरांसोबत, त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर होता. मी त्यांचं काम बघत आलेय. मी त्यांना जेव्हा या मंचावर पाहिलं, त्यावेळी थोडं दडपण आलं होतं. मी शूटनिमित्त साताऱ्यात असल्यानं डायरेक्ट टेक्निकलसाठी भेटले आणि आमचा लगेच परफॉर्मन्सही होता. आमचा परफॉर्मन्स झाल्यावर श्रेयस सरांनी मला विचारलं, "शरयू काय चाललंय तुझं...?" मी सांगितल पारू करतेय, तेव्हा त्यांची रिएक्शन होती ओ पारू..., म्हणजे त्यांचं म्हणणं होत की, त्यांना ही मालिका माहितीय. त्यांच्यापर्यंत 'पारू' मालिका पोहचली आहे, हे त्यांच्या तोडून ऐकून खूप छान वाटलं."
"मला त्यांची एक गोष्ट इतकी भारी वाटली की, त्यांना माझं नाव एकदा सांगून लक्षातही राहिलं आणि त्यांनी माझी विचारपूसही केली. आमचा डान्स होता, त्यात बरीच मराठी गाणी होती. म्हणजे, 1950 पासूनची गाणी आणि माझं गाणं होत 'ऐरणीच्या देवा तुला...'. माझं आवडत गाणं आहे हे आणि त्यावर डान्स करायला आणि ते ही श्रेयस तळपदेंसोबत ही खूप मोठी गोष्ट होती, हा अनुभव मला नेहमी लक्षात राहील".
महत्त्वाच्या इतर बातम्या :