Cricket Star Chahal and RJ Mahvash Break Social Media Ties: भारतीय क्रिकेट संघाचे स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्यातील मैत्री आता संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे. दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे दोघांमधील नातं संपुष्ठात आल्याची चर्चा आहे.  चहल आणि महवश यांची मैत्री गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरली होती.  अनेकांना वाटत होतं की,  दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत.  इतकंच नव्हे तर, काही नेटकऱ्यांनी  आरजे महवशवर टीकेचे बाण सोडले. काहींनी तिला घर तोडणारी, असं म्हणत गंभीर आरोप केले होते.  या सर्व चर्चांबाबत युजवेंद्र चहल याने स्वत: एका पॉडकास्टमध्ये भाष्य करत काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. 

Continues below advertisement

दरम्यान, अलिकडेच चहल आणि महवश यांनी एकमेकांना सोशल मीडियावर  अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे का?  असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांची मैत्री खरंच संपली आहे का, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.  दरम्यान, दोघांनी अद्याप एकमेकांना अनफॉलो करण्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. 

आरजे महवशवर चहलचं संसार तोडण्याचा आरोप

राज शमानीच्या पॉडकास्टवर बोलताना चहल म्हणाला,  "मी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी कोणासोबत दिसलो, त्यामुळे लोकांनी आपल्या परिनं अदांज लावायला सुरूवात केली. आरजे महवशला घर तोडणारी असं म्हटलं गेलं.  अनेकांनी आम्हाला एकत्र पाहून बरेच प्रश्न विचारले.  मला वाईट वाटते की, ज्या मैत्रिणनं मला वाईट काळात मदत केली तिला या सगळ्यात ओढले जात आहे", असं चहलनं स्पष्ट केलं. "आम्ही फ्रेंड्स ग्रुपसोबत असतानाही, फक्त आमचे फोटो क्रॉप करून वापरले जात होते. व्हायरल करण्यात येत होते. आम्ही दोघांनी बाहेर भेटणं बंद केले. आम्हाला भीती वाटत होती, की आमच्या भेटीची आणखी चर्चा होऊ शकते." दरम्यान,  नुकतंच दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं.  त्यामुळे दोघांमधील मैत्री संपुष्टात आली आहे का? असे  अनेक प्रश्न विचारले जात आहे.

Continues below advertisement

चहल अन् महवशने एकमेकांना अनफॉलो केलं

युजवेंद्र चहल आणि धनश्रीनं संसाराला पू्र्णविराम दिला. दोघांनी काडीमोड घेतला.  घटस्फोट घेतल्यानंतर चहल आणि आरजे एकत्र दिसले.  दोघेही एकत्र अनेक कार्यक्रमात दिसले. यामुळे दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. आरजे महवशवर टीकेचे बाण सोडण्यात आली.