Elvish Yadav ED Summons For Inquiry: मुंबई : YouTuber आणि Bigg Boss OTT 2 चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ ​एल्विश यादव (Elvish Yadav News) याच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याच्या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं (ED) एल्विश यादव (Elvish Yadav) याला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. एल्विशला 23 जुलै रोजी लखनऊला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. यापूर्वी ईडीनं 8 जुलै रोजी नोटीस बजावली होती. मात्र एल्विशनं परदेशात असल्याचं कारण देऊन काही दिवसांचा कालावधी मागितला होता.


अंमलबजावणी संचालनालयानं (ED) यूट्यूबर सिद्धार्थ यादव उर्फ ​​एल्विश यादव याला 23 जुलै रोजी मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. हे प्रकरण रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा म्हणून सापाच्या विषाचा वापर करण्याशी संबंधित आहे. ईडीनं याप्रकरणी मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर, एल्विश आणि त्याच्याशी संबंधित लोकांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर (FIR) आणि आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर, नोएडा पोलिसांनी मनी लाँडरिंग (पीएमएलए) अंतर्गत आरोप दाखल केले. 


हरियाणाचा गायक राहुल यादव उर्फ ​​राहुल फाजिलपुरिया याची या आठवड्यात ईडीनं चौकशी केली, ज्याचा एल्विश यादवशी संबंध असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आणखी चौकशी होऊ शकते. रेव्ह पार्ट्यांसाठी बेकायदेशीर पैशांचा वापर ईडीकडून तपास सुरू आहे. पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याच्या चौकशीच्या संदर्भात नोएडा पोलिसांनी 17 मार्च रोजी एल्विश यादवला अटक केली होती. 26 वर्षीय युट्युबर एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी 2 या रिॲलिटी शोचा विजेता आहे. नोएडा पोलिसांनी एल्विशविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.                  


पीपल फॉर ॲनिमल्स या एनजीओच्या तक्रारीवरून नोएडातील सेक्टर 49 पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला एफआयआर दाखल करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये एल्विश यादव यांचा समावेश होता. यामध्ये आणखी पाच आरोपी होते, हे सर्व सर्पमित्र आहेत. त्याला नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती आणि नंतर स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.            


पाहा व्हिडीओ : ED Summons Elvish Yadav: एल्विश यादवला ED कडून समन्स