मुंबई : मुंबईतील ओशिवरा येथील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी मध्यरात्री एअरगनच्या गोळ्या घुसल्याची खळबळजनक (Mumbai Fire News) घटना समोर आली आहे. समोरील इमारतीमध्ये चार तरुण एअरगनसह खेळत असताना त्यांच्याकडून गोळी सुटल्याचे समोर आले आहे. ज्या इमारतीवर गोळी धडकली त्या इमारतीमध्ये अभिनेते अशोक सराफ वास्तव्यास आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं, ओशिवरा पोलिसांनी चौकशी करून चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Mumbai Fire News) 


इंद्रदर्शनमधील इमारत क्रमांक 10 मध्ये वास्तव्यास असलेल्या एका रहिवाशाने या घटनेबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी मध्यरात्री ते दिल्लीहून परतले होते. घरात झोपले असताना खिडकीच्या काचेवर काहीतरी आदळल्यासारखा आवाज आला. आवाजामुळे त्यांच्या लक्षात आले की, गोळीबार झाल्यानं खिडकीच्या काचेला मोठं छिद्र पडलं आहे. पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज आल्यानं परिसरात भिती पसरली. तपासात समोर आले की, समोरील इमारतीतील फ्लॅटमधून खेळताना गोळी सुटली. या घटनेच्या आधारावर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, चार तरुणांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.(Mumbai Fire News) 


नेमकं काय घडलं?


ओशिवारा येथे छर्रेवाल्या पिस्तुलने एका कुटुंबाच्या बेडरुममध्ये फायरिंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फायरिंग झालेल्या समोरच्या बिल्डिंगमधून तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या घरातून एअर पिस्तुल आणि फुगे फोडण्याचे छर्रे सापडले आहेत. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला पहाटे किरण सेहगल यांनी फोन केला होता. त्या घरी अज्ञात व्यक्तींकडून छर्रेवाल्या पिस्तुलने फायरिंग करण्यात आल्याची माहिती त्यांनी नियंत्रण कक्षाला दिली.


पोलिसांनी सेहगल यांच्या घराची पाहणी केली असता, घराच्या खडकीवरील काचेला एक छोट छिद्रे पडलेले आढळले. तर घरात एक छर्रा ही पोलिसांना सापडला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सेहगल यांच्यासमोरील ओशिवरातील फ्लोरा हाईट्स बिल्डिंगची झाडा झडती घेतली. त्यावेळी सेहगल यांच्या समोरील खिडकीत म्हणजेच फ्लोअरा हाईट्समध्ये तीन ते चार तरुण सापडले ज्यांच्याकडे ही एअर गण व छर्रे मिळून आलेत. या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहे .