Continues below advertisement

Yashs Toxic Teaser Sparks Buzz: केजीएफ स्टार यशच्या टॉक्सिक चित्रपटाने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात तो राया ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये चारचाकीमध्ये बोल्ड महिला दाखवण्यात आली. या बोल्ड सीनमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. या बोल्ड सीनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, या सीनमधील ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान, ती अभिनेत्री नेमकी कोण? याची माहिती समोर आली आहे.

टॉक्सिक चित्रपटाचा टीझर रिलीज

टॉक्सिकच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेली अभिनेत्रीनं सस्पेन्स निर्माण केला आहे. त्या अभिनेत्रीचा चित्रपटात नेमका रोल काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. अनेकांनी ती हॉलिवूड अभिनेत्री नतालिया बर्न असल्याचा दावा केला आहे. तर, काहींनी ती अडल्ड स्टार साशा ग्रे असल्याचा अंदाज लावला आहे. दरम्यान, ती अभिनेत्री नेमकी कोण? या प्रश्नावर चित्रपटाचे दिग्दर्शक गीतू मोहनदास यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून टॉक्सिकमधील मिस्ट्री गर्लच्या नावाबाबत खुलासा केला आहे.

Continues below advertisement

इंटिमेट सीनमधील अभिनेत्री कोण?

टीझरमध्ये यशसोबत अभिनेत्रीनं इंटिमेट सीन केला होता. बीट्रिज टॉफेनबाख असे अभिनेत्रीचं नाव आहे. या चित्रपटात तिला स्मशानभूमीच्या संबंधित दाखवण्यात आले आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त टॉक्सिक चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. टीझर इंटिमेट सीनमुळे चर्चेत आला होता. टीझर रिलीज झाल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

एकाच दिवशी टॉक्सिक आणि धुरंधरचा सिक्वेल रिलीज

टॉक्सिक चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. 2014 त्यांना लायर डाइस या हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता त्यांचा आगामी टॉक्सिक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत दिसत आहे. तसेच कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा, तारा सुतारिया आणि रूक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 11 मार्च 2026 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 11 मार्च 2026 रोजी धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, टॉक्सिक धुरंधरच्या सिक्वेलला टक्कर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

धक्कादायक! स्टार अभिनेता अन् इंडियन आयडल 3च्या विजेत्याचा दुर्दैवी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?