Yami Gautam Film Thursday Connection With Mumbai Kidnapping Case: मुंबईतील (Mumbai Hostage Scare) हाय प्रोफाईल परिसर पवईत (Powai Case) गुरुवारी दुपारी घडलेल्या घटनेनं अख्खा देश हादरला. एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. पोलिसांना माहिती मिळाली, तेव्हापासूनच संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी सुरुवातीला आरोपीसोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर मुलांना सुखरुप सोडवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांमध्ये आरोपीला गोळ्या घालण्यात आल्या. आरोपी रोहित आर्यच्या (Rohit Arya) छातीच्या उजव्या बाजूला गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आणि आरोपीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण, ही संपूर्ण घटना फक्त 17 मुलांनाच नाहीतर, संपूर्ण शहराला वेठीस धरणारी होती. ही घटना घडली आणि सोशल मीडियावर एका फिल्मची जबरदस्त चर्चा रंगली. ती फिल्म म्हणजे, 2022 साली आलेली 'अ थर्सडे'. आश्चर्याची गोष्टी म्हणजे, पवईतील खळबळ उडवून देणारं प्रकरण आणि यामी गौतमचा सिनेमा 'अ थर्सडे'चं कथानक यामध्ये बरचंस साम्य आहे. 'अ थर्सडे'मधील यामी गौतम प्रमाणे रोहितही आपला मुद्दा मांडू इच्छित होता.
आपण जर पवईतल्या संपूर्ण प्रकरणाला 'अनदर थर्सडे' असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण जसं सिनेमात गुरुवार होता, त्याचप्रमाणे पवईतली घटना घडतेवेळीही गुरुवार होता.
मुंबईतील पॉश पवई परिसरात नाट्यमय घटना अचानक घडल्या. इथे असलेल्या आरए स्टुडिओमध्ये गेल्या 6 दिवसांपासून एका वेब सीरिजचे ऑडिशन्स सुरू होते. या ऑडिशन्ससाठी मुलं या स्टुडिओत आली होती. गुरुवारी ऑडिशन्सचा सातवा दिवस होता आणि त्यात सहभागी होण्यासाठी देशातील अनेक राज्यांमधून 17 मुलं आली होती. या सर्व मुलांना रोहित आर्यनं ऑडिशन्ससाठी बोलावलं होतं. अचानक रोहितनं तिथे उपस्थित असलेल्या 17 मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवलं. ही घटना 'अ थर्सडे' चित्रपटाच्या धर्तीवर होती, ज्यामध्ये यामी गौतमनं तिला शिकवलेल्या मुलांचं अपहरण केलेलं.
'ए थर्सडे' सिनेमाशी मुंबईतील किडनॅपिंग प्रकरणाचं कनेक्शन योगायोग की, रचलेला कट?
2022 मध्ये आलेला सिनेमा 'ए थर्सडे' प्रमाणेच मुंबईमध्ये 30 ऑक्टोबरला रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीनं काही मुलांना ओलीस ठेवलं. दरम्यान, तो या दरम्यान पोलीसांच्या गोळीचा शिकार झाला. तसेच, 'ए थर्सडे' सिनेमात यामी गौतम जी प्ले स्कूलमधली टीचर आहे, ती अचानक एक दिवस तिच्या प्ले स्कूलमध्ये येणाऱ्या 16 मुलांना ओलीस ठेवते आणि तीन मागण्या समोर ठेवते. पहिली मागणी असते, 25 कोटी रुपयांची, त्यानंतरची पुढची मागणी असते, थेट पंतप्रधानांशी बोलण्याची आणि तिसरी मागणी असते की, स्वतः टीव्ही समोर येऊन स्वतःच्या बाजू सर्वांना सांगण्याची.
'ए थर्सडे' सिनेमात जेव्हा यामी गौतम आपली शेवटची मागणी पूर्ण करते आणि संपूर्ण देशासमोर आपली बाजू ठेवते, त्यावेळी संपूर्ण फिल्ममध्ये व्हिलन भासणारी यामी सगळ्या प्रेक्षकांसाठी हिरो ठरते. यामी गौतम महिलांच्या छळाचे प्रश्न देशासमोर मांडते. या चित्रपटात यामी गौतमनं नैना नावाच्या प्लेस्कूल शिक्षिकेची भूमिका साकारली आहे.
रोहित आर्या सरकारवर का नाराज होता?
मुलांचं अपहरण केल्यानंतर, रोहित आर्यनं एक व्हिडीओ जारी केला, ज्यामध्ये तो दहशतवादी किंवा पैसे मागणारा अपहरणकर्ता नसल्याचं म्हटलं होतं. रोहित गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता आणि त्यामागील कारण म्हणजे, सरकारनं त्यांच्यावर केलेला अन्याय होता. रोहितनं दावा केला की, तो अलिकडेच सरकारविरुद्ध उपोषणाला बसला होता. त्यानं स्पष्ट केलं की, त्यानं शिक्षण विभागासाठी एक प्रकल्प विकसित केला होता आणि त्यासाठी त्यानं बँकेचं कर्जही घेतलं होतं. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' नावाच्या या उपक्रमामुळे मोठा वाद निर्माण झाला. सरकारनं त्यासाठी पैसे देण्यास नकार दिला, ज्यामुळे रोहितचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं.
पाहा सिनेमाचा ट्रेलर:
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती