Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकतो. तो लवकरच  ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना रनौतनं(Kangana Ranaut) केली आहे. तसेच या चित्रपटचं दिग्दर्शन साई कबीरनं केलं आहे. चित्रपटामध्ये नवाजुद्दीबरोबरच अवनीत कौर (Avneet Kaur) देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला कंगनासोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. यावर नवाजुद्दीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 


अशी चर्चा सुरू असते की, कंगनासोबत काम करताना अनेक अभिनेत्यांना भिती वाटते, तुम्हाला कंगनासोबत काम करताना कसा अनुभव आला?' असा प्रश्न मुलाखतीमध्ये नवाजुद्दीला विचारण्यात आला. या प्रश्नावर नवाजुद्दीननं उत्तर दिलं, ' मला आजिबात भिती वाटली नाही. ती खूप चांगली निर्माती आहे, तिच्यासोबत काम करून खूप मजा आली. ती खूप चांगली मुलगी आहे.'






‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाचं शूटिंग फेब्रुवारी महिन्यामध्ये संपले. चित्रपट हा अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. लवकरच कंगनाचा धाकड हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 


हेही वाचा :