Woman Complaint Against Actor Ajaz Khan: उल्लू अॅपवरच्या (Ullu App) 'हाऊस अरेस्ट' (House Arrest) शोमुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या एजाज खानच्या (Ajaz Khan) अडचणींत आणखी वाढ झाली आहे. अभिनेता एजाज खान विरोधात मुंबईत (Mumbai News) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 मे रोजी एजाज खानवर शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल  करण्यात आलेला. एका महिनेनं एजाजवर बलात्काराचा आरोप केला आहे.

Continues below advertisement


पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, एजाज खाननं सिने इंडस्ट्रीत प्रवेश देण्याच्या बहाण्यानं बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप आहे. दरम्यान, एजाज खानवर 'हाऊस अरेस्ट' शोमुळे निर्माण झालेल्या विवादानंतर एफआयआर दाखल करण्यात आलेला. त्यानंतर आता बलात्काराच्या प्रकरणात गुन्हाही दाखल झाल्यामुळे एजाज खान दुहेरी अडचणीत सापडला आहे. 


फिल्ममध्ये मोठा रोल देतो, सांगून बलात्कार 


महिलेनं केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर एजाज खानविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारकोप पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 30 वर्षीय महिलेनं अलिकडेच तक्रार दाखल केली होती की, अजाज खाननं तिला चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप केला होता. तसेच, तिला धर्मांतर करून लग्न करण्याचं आश्वासन देऊन, त्यानं अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अभिनेत्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या बलात्काराशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.


'हाऊस अरेस्ट' शोमुळे एजाज खान वादाच्या भोवऱ्यात 


'हाऊस अरेस्ट' या रिअॅलिटी शोमधील अश्लील कंटेंटमुळे एजाज खान आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोमधील आक्षेपार्ह टास्क आणि डायलॉग्समुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यानंतर 'हाऊस अरेस्ट' शो आणि एजाज खानला खूप ट्रोल करण्यात आलं. उल्लू अॅपच्या 'हाऊस अरेस्ट' या वेब शोमध्ये अश्लील कंटेन्ट दाखवल्याबद्दल एजाज खानसह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


'हाऊस अरेस्ट' शोचा वाद नेमका काय? 


'हाऊस अरेस्ट' शोचा कंटेंट हे या वादाचं मुख्य कारण आहे. सोशल मीडिया युजर्स आणि टीकाकारांनी ते अश्लील, भारतीय संस्कृतीविरुद्ध आणि नैतिकतेचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. स्पर्धकांमधील अत्यंत अश्लील संभाषणं आणि आक्षेपार् टास्क दाखवणाऱ्या शोच्या व्हायरल क्लिप्समुळे या शोविरोधात रोष वाढला. अनेकांनी हा शो म्हणजे, भारतीय संस्कृती नष्ट करण्याचं षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे. 1 मे 2025 रोजी, शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या x हँडलवर शोचा व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर टीका केली. त्यांनी याला अश्लीलतेचा प्रचार म्हटलं आणि अशा कंटेंटचा प्रचार करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रश्न उपस्थित केले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Neena Gupta Vivian Richards Affair: 'सर्वांनी अबॉर्शन करायला सांगितलं, पण रिचर्ड्सनं... '; लग्नापूर्वीच गरोदर राहिलेल्या नीना गुप्तांचे बाळंतपणानंतरही क्रिकेटरशी प्रेमसंबंध