Awarapan 2 box office collection: इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) नुकताच प्रदर्शित झालेला 'आवारापन 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओपनिंग डेलाच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर (Entertainment) कमाई केली.  तीन दिवसांत या सिनेमाने 10 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला खास जेन झींकडून  चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत  आहे.  'आवारापन 2' या सिनेमातील इम्रान हाश्मीने साकारलेलं पात्र 'शिव पंडित'ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.  दरम्यान, 'आवारापन 2' या सिनेमाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी किती कोटींचं कलेक्शन केलं?  जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मंडे टेस्टमध्ये 'आवारापन 2' पास, किती कोटींचा गल्ला जमवला? (Awarapan 2 box office collection day 4)

2007 साली प्रदर्शित झालेली मोहित सुरी दिग्दर्शित  'आवारापन' या सिनेमाचा सिक्वेल 'आवारापन 2'  आहे.  या सिनेमातील जबरदस्त स्टोरी आणि उत्तम म्यूझिकमुळे प्रेक्षकवर्गाला थिएटरपर्यंत खेचून घेण्यास  चित्रपट यशस्वी ठरला आहे. काही दिवसांपूर्वी सनी देओल यांचा 'बंटवारा 1947' हा सिनेमा देखील रिलीज झाला होता.  'आवारापन 2' आणि 'बंटवारा 1947' या सिनेमात सध्या स्पर्धा पाहायला मिळत आहे.    दरम्यान, 'आवारापन 2'  समोर 'बंटवारा 1947' फिकी पडली आहे. 'आवारापन 2'  इम्रान हाश्मीच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली आहे.  'आवारापन 2'  हा चित्रपट मंडे टेस्टला पास झाला की नाही, पाहूयात.

'आवारापन 2' हा सिनेमा 14 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.  ओपनिंग डेला या सिनेमाने  22 कोटींचं कलेक्शन केलं. यानंतर दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. 15 ऑगस्टला या सिनेमाने 33.75 कोटींचं कलेक्शन केलं.   तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 26 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  'आवारापन 2'  या चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी चांगली कामगिरी केली. पण या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. 

Continues below advertisement

सोमवारी 'आवारापन 2'  या सिनेमाने  9.25 कोटींचं कलेक्शन केलं आहे.   'आवारापन 2'  या सिनेमाने मंडे टेस्ट पास केला आहे.  हा अॅक्शन ड्रामा सिनेमा  2026 म्हणजेच या वर्षीचा  सोमवारी सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला.   नितिन कक्कर दिग्दर्शित 'आवारापन 2' या सिनेमातून इम्रान हाश्मीने कमबॅक केला आहे.  या सिनेमात इम्रान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका आहे.   हा सिनेमा 14 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?