हॉलिवूड, बॉलिवूड अन् टॉलिवूड.. या तीन प्रमुख सिनेसृष्टी सध्या आपल्या भारतात चर्चेत आहेत. या तिन्ही सिनेसृष्टीतील चित्रपट आवर्जून पाहिले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड म्हणतात. आपण अनेकदा बॉलिवूड चित्रपट, बॉलिवूड अभिनेता, बॉलिवूड स्टार किंवा बॉलिवू़ड दिग्दर्शक संबोधताना पाहिलं असेल. पण आपण कधी विचार केलाय का की; बॉलिवूड हा शब्द नेमका कुठून आलाय? हिंदी सिनेसृष्टीला बॉलिवूड असं का म्हटलं जातं? याचं उत्तर जाणून घेऊयात.
बॉलिवूड या शब्दाचं हॉलिवूडशी आहे खास कनेक्शन
हॉलिवूड हे मुळत: विदेशी भाषेच्या फिल्म इंडस्ट्रीला म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूड हे नाव खरंतर बॉलिवूडपासून प्रेरित असल्याची माहिती आहे.
हॉलिवूड हे नाव कसे पडले?
लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड नावाची जागा होती. हॉलिवूड नावाच्या जागेवरून हॉलिवूड हे नाव पडले, अशी माहिती आहे. यानंतर हॉलिवूड हे नाव जगप्रसिद्ध झाले. प्रेक्षकवर्ग देखील विदेशी सिनेसृष्टीला हॉलिवूड म्हणून ओळखू लागले.
बॉलिवूड हे नाव कसे पडले?
त्यानंतर, हिंदी सिनेसृष्टीने प्रेरित होऊन, हॉलिवूड शब्दातून H अक्षर काढला. त्याऐवजी B शब्दाचा वापर केला. B या शब्दाचा वापर करण्यात आला, कारण त्यावेळेस मुंबई ही बॉम्बे होती. म्हणून बॉम्बे म्हणून B घेण्यात आला. बॉम्बे आणि हॉलिवूड या दोन शब्दाच्या संयोगातून बॉलिवूड हा शब्द तयार झाला. अशा प्रकारे हिंदी इंडस्ट्रीचे नाव बॉलिवूड पडले. जेव्हा बॉलिवूड हे नाव हिट झाले, तेव्हा भारतात वेगवेगळ्या भाषांमधील इंडस्ट्रीने 'वूड' हा शब्द ठेवला, तसेच आपापल्या इंडस्ट्रीचे नाव तयार केले. त्यांच्या भाषेच्या शब्दाशी संबंधित शब्द जोडून इंडस्ट्रीला एक नवे नाव दिले.
तामिळ सिनेसृष्टीला कॉलिवूड म्हणतात. जिथे तामिळ चित्रपटांची निर्मिती केली जाते. तेलुगू चित्रपट उद्योगाला टॉलिवूड म्हणतात. जिथे तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली जाते. तसेच उडिया फिल्म इंडस्ट्रीला ऑलिवूड म्हटले जाते. या इंडस्ट्रीमध्ये चित्रपट तयार होतात. तर, कन्नड फिल्म इंडस्ट्रीला सॅन्डलवूड किंवा चंदनवना म्हटले जाते. या सिनेसृष्टीत कन्नड चित्रपटांची निर्मिती होते. यांसह पंजाब फिल्म इंडस्ट्रीला पॉलिवूड म्हटले जाते. जिथे पंजाबी चित्रपट तयार होतात.
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट कोणता?
हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास १०० हून अधिक जुना आहे. दादासाहेब फाळके यांना चित्रपट उद्योगाचे जनक मानले जातात. त्यांच्या दिग्दर्शनाखाली पहिला चित्रपट, राजा हरिश्चंद्र स्वातंत्र्यापूर्वी १९१३ रोजी प्रदर्शित झाला. दरम्यान, १९३० च्या दशकात, मुंबईत हिंदी चित्रपटांचे एक मोठे साम्राज्य विकसित झाले. जे आजही बॉलिवूड म्हणून विकसित आहे.